संबंध एकीशी, घरोबा दुसरीशी करणाऱ्याला पोलिस कोठडी

By रवींद्र चांदेकर | Published: December 16, 2023 06:08 PM2023-12-16T18:08:50+5:302023-12-16T18:09:05+5:30

तालुक्यातील एका गावात संबंध एकीशी, तर घरोबा दुसरीशी करणाऱ्या तरुणावर पोलिस कोठडीत जाण्याची वेळ आली आहे.

Police custody for those who have relations with one, Gharoba with another | संबंध एकीशी, घरोबा दुसरीशी करणाऱ्याला पोलिस कोठडी

संबंध एकीशी, घरोबा दुसरीशी करणाऱ्याला पोलिस कोठडी

दारव्हा (यवतमाळ: तालुक्यातील एका गावात संबंध एकीशी, तर घरोबा दुसरीशी करणाऱ्या तरुणावर पोलिस कोठडीत जाण्याची वेळ आली आहे. स्वप्नील वानखेडे, असे आरोपीचे नाव आहे. एका गावात अल्पवयीन तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षांपासून आरोपीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, १४ डिसेंबरला तो दुसऱ्याच तरुणीसोबत बोहल्यावर चढला. ही बातमी कळताच संतापलेल्या तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. स्वप्नीलविरुध्द तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ त्या गावात जाऊन नवीन संसाराची स्वप्ने पाहत बसलेल्या आरोपीस ताब्यात घेतले. पोलिसांची गाडी दारापुढे बघताच आरोपी व लग्नाला आलेली पाहुणे मंडळी अवाक झाली.

नवीन नवरी घरात येऊन हळद फिटण्यापूर्वीच आरोपीवर लॉकअपमध्ये बसण्याची वेळ आल्याने या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे. या प्रकरणी आरोपीविरुध्द भादंवि कलम ३७६ सह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई कार्यवाही पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार विलास कुलकर्णी, पोहेकॉ सुनील राठोड, सुरेश राठोड, रामराव राठोड, सलीम पठाण, शरद सावळे यांनी पार पाडली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक धनंजय रत्नपारखी करीत आहे.
 

Web Title: Police custody for those who have relations with one, Gharoba with another

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.