वणीत लाडू वाटणारे पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:13 AM2019-01-09T00:13:40+5:302019-01-09T00:17:29+5:30

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकंूद कुळकर्णी यांना लाच प्रकरणात अटक केल्याच्या घटनेचा लाडू वाटून आनंद व्यक्त करणाऱ्या तिघांना वणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Police custody of Vanity Laddu | वणीत लाडू वाटणारे पोलिसांच्या ताब्यात

वणीत लाडू वाटणारे पोलिसांच्या ताब्यात

Next
ठळक मुद्देजल्लोष तिघांच्या अंगलट : कुळकर्णींच्या अटकेचा आनंद व्यक्त करणे भोवले

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकंूद कुळकर्णी यांना लाच प्रकरणात अटक केल्याच्या घटनेचा लाडू वाटून आनंद व्यक्त करणाऱ्या तिघांना वणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
शनिवारी अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने यवतमाळ येथे कारवाई करून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकूंद कुळकर्णी यांना अटक केली. मुकूंद कुळकर्णी हे बराच काळ वणी व शिरपूर येथे ठाणेदार म्हणून कार्यरत होते. वणी येथील कारकिर्दीत शहरातील एका व्यापाºयाशी त्यांचे खटके उडाले. पुढे एका प्रकरणात ठाणेदार कुळकर्णी यांनी या व्यापाºयाच्या व त्याच्या मुलाच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते. तेथूनच कुळकर्णी व संबंधित व्यापारी या दोघात वादाची मोठी ठिणगी पडली. एकमेकांविरोधात कुरघोड्यांचे सत्रच सुरू झाले.
कालांतराने मुकूंद कुळकर्णी यांची यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेत निरीक्षक म्हणून वर्णी लागली. अलिकडेच ते लाचेच्या प्रकरणात एसीबीच्या जाळ्यात अडकले. त्यानंतर संबंधित व्यापाºयाच्या हस्तकाने यवतमाळ येथे जाऊनदेखिल पेढे वाटल्याची चर्चा आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी ३.३० वाजताच्या सुमारास संबंधित व्यापाºयाची मुले आॅटोत लाडू भरून शहरात त्याचे वाटप करित होते. वाटप करत-करत पोलीस ठाणे परिसरात पोहोचले. या आॅटोवर कुळकर्णी यांच्याविरोधात कारवाई केल्याबद्दल अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाचे अभिनंदन करणारे फलकदेखिल लावण्यात आले होते. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच, पोलिसांनी लगेच पुढे होऊन लाडू वाटणाºया दोन युवकांना ताब्यात घेऊन आॅटोदेखिल पोलीस ठाण्यात लावला. तसेच व्यापारी असलेल्या या युवकांच्या पित्यालादेखिल पोलीस ठाण्यात पाचारण केले. हा प्रकार घडल्यानंतर व्यापाºयाचा अधिकृत विधीज्ञदेखिल पोलीस ठाण्यात पोहोचला. त्यामुळे ठाण्यासमोर मोठा जमाव एकत्र आला होता. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कारवाईबाबत पोलिसांची खलबतं सुरू होती. काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Web Title: Police custody of Vanity Laddu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस