पोलीस शिपाई ‘एसीबी’च्या जाळ््यात

By admin | Published: January 17, 2016 02:23 AM2016-01-17T02:23:45+5:302016-01-17T02:23:45+5:30

एका प्रकारणात आरोपी न करण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच घेताना लोहारा पोलीस ठाण्याचा शिपायी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ््यात शनिवारी अडकला.

Police force 'ACB' burns | पोलीस शिपाई ‘एसीबी’च्या जाळ््यात

पोलीस शिपाई ‘एसीबी’च्या जाळ््यात

Next

अडीच हजाराची लाच : सहकार्य करणाऱ्या टेलरवरही गुन्हा दाखल
यवतमाळ : एका प्रकारणात आरोपी न करण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच घेताना लोहारा पोलीस ठाण्याचा शिपायी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ््यात शनिवारी अडकला. ही कारवाई लोहारा येथील नवदुर्गा चौकात करण्यात आली असून, पोलिसाला सहकार्य करणाऱ्या टेलरवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश गणपतराव डोंगरे असे एसीबीच्या जाळ््यात आडकलेल्या पोलिसाचे नाव असून, वासुदेव प्रल्हाद मानकर असे टेलरचे नाव आहे. संबंधित तक्रारकर्त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल न करण्यासाठी रमेश डोंगरे याने अडीच हजार रुपयांची लाच मागितली.
त्यासाठी टेलर वासुदेव मानकर याने तक्रारकर्त्याला लाच देण्यास प्रोत्साहित केले. त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करण्यात आली. त्यावरून शनिवारी सापळा रचण्यात आला. लोहाराच्या नवदुर्गा चौकात अडीच हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. (नगर प्रतिनिधी)
 

Web Title: Police force 'ACB' burns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.