यवतमाळात शिक्षणाधिका-यांना मारहाण, अंगावर शाई फेकली, सहा जणांविरुद्ध पोलिसात तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2017 08:21 PM2017-11-02T20:21:23+5:302017-11-02T20:21:33+5:30

वणीतील विद्यार्थ्यांना अकराव्या वर्गात प्रवेश न दिल्याच्या वादातून गुरुवारी सायंकाळी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामन वंजारी यांना मारहाण करण्यात आली.

Police in police custody against Yavatmal, 6 others in police firing | यवतमाळात शिक्षणाधिका-यांना मारहाण, अंगावर शाई फेकली, सहा जणांविरुद्ध पोलिसात तक्रार 

यवतमाळात शिक्षणाधिका-यांना मारहाण, अंगावर शाई फेकली, सहा जणांविरुद्ध पोलिसात तक्रार 

Next

यवतमाळ : वणीतील विद्यार्थ्यांना अकराव्या वर्गात प्रवेश न दिल्याच्या वादातून गुरुवारी सायंकाळी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामन वंजारी यांना मारहाण करण्यात आली. यावेळी त्यांच्या चेहºयावर शाईसुद्धा फेकण्यात आली. 
चिंतामन वंजारी यांना वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. दरम्यान या प्रकरणी वडगाव रोड पोलीस ठाण्यात संघटनेच्या पाच ते सहा कार्यकर्त्यांविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे. वृत्तलिहिस्तोवर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. 
वणी येथील ३१ विद्यार्थी अकरावी विज्ञान प्रवेशापासून वंचित राहिले. त्यांना प्रवेश मिळावा यासाठी  ‘लढा विद्यार्थ्यांचा-शिक्षणाच्या हक्काचा’ या संघटनेचे प्रमुख स्वप्नील धुर्वे यांनी संघर्ष चालविला. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी निवेदने, उपोषणेही केली गेली. मात्र पदरी निराशाच पडली. गुरुवारी संघटनेचे कार्यकर्ते शिक्षणाधिकारी चिंतामन वंजारी यांच्या भेटीसाठी यवतमाळात आले होते. परंतु शिक्षण विभागाचा गोधनी रोडवरील विद्यालयात कॅम्प सुरू होता. वारंवार संपर्क करूनही भेट न झाल्याने अखेर सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास हे कार्यकर्ते कॅम्पमध्ये पोहोचले. तेथे चर्चे दरम्यान वंजारी यांना मारहाण झाली. एका कार्यकर्त्याच्या हातातील कडे डोक्याला लागल्याने जखम झाल्याचे सांगितले जाते. यावेळी कार्यकर्त्यांनी वंजारी यांच्या चेहºयावर शाईही फेकली. शिक्षणाधिकाºयावरील या हल्ल्याने जिल्हा परिषद व शिक्षण क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. 
कोट
संचमान्यता दुरुस्ती शिबिर आटोपल्यानंतर दबा धरुन असलेल्या गुंडांंनी माझ्यावर हल्ला केला. पाच ते सहा जण दारू पिलेल्या अवस्थेत मारहाण करण्यासाठीच आले होते. 
- चिंतामन वंजारी
शिक्षणाधिकारी (माध्यमिक), यवतमाळ

Web Title: Police in police custody against Yavatmal, 6 others in police firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.