यवतमाळ जिल्ह्यात आयपीएल सट्टा अड्ड्यावर पोलिसांची धाड; चार जणांना अटक; तीन फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2022 07:21 PM2022-05-11T19:21:16+5:302022-05-11T19:21:44+5:30
Yawatmal News वणी शहरालगत असलेल्या चिखलगांव येथील एका ले-आऊट मध्ये किरायाच्या घरात सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर काल रात्री उशिरा पोलिसांनी धाड टाकून क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या चार आरोपींना अटक केली आहे.
यवतमाळ : वणी शहरालगत असलेल्या चिखलगांव येथील एका ले-आऊट मध्ये किरायाच्या घरात सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर काल रात्री उशिरा पोलिसांनी धाड टाकून क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या चार आरोपींना अटक केली आहे.
घटनास्थळावरून पोलिसांनी जवळपास पावणे नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.चिखलगांव येथील खुराणा ले-आऊट मधील एका किरायाच्या रूम मध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा घेतला जात असल्याची ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांना विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली.
ठाणेदारांनी सपोनि प्रवीण हिरे यांच्यासह पोलिस पथक तयार करून खुराणा ले-आऊट मधील त्या घराजवळ सापळा रचला. घराचा चारही बाजूंनी ताबा घेत खिडकीतून घरात डोकावून पहिले असता त्या ठिकाणी काही इसम आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा घेतांना आढळले. पोलिसांनी अतिशय शिताफीने त्या रूम मध्ये प्रवेश करून आयपीएल क्रिकेट सट्ट्याची ऑनलाईन उतारवाडी घेणाऱ्या चार आरोपींना रंगेहाथ अटक केली. १० मे ला लखनऊ सुपर जॉईंट विरुद्ध गुजरात टायटन्स या संघादरम्यान सामना होता. या सामन्यावर सट्टा घेतला जात असल्याची गुप्त माहिती ठाणेदारांना मिळाली.
ठाणेदारांनी पोलीस पथकासह रात्री उशिरा खुराणा ले-आऊट मधील क्रिकेट सट्टा सुरु असलेल्या त्या किरायाच्या रूमवर धाड टाकली. त्या ठिकाणी काही ईसम क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा घेतांना आढळून आले. सट्ट्याची उतारवाडी घेणाऱ्या चार जणांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये संदीप नारायण देवगडे (३४) रा. चिखलगांव, सौरभ राजेंद्र मिश्रा (२८) रा. वरोरा, शिवदास संभाजी तडस रा. वरोरा, अब्दुल छनील अब्दुल वाहिद शेख (३५) रा. सुराणा ले-आऊट वणी यांचा समावेश असून त्यांच्यावर मजुका च्या कलम ४,५ व सहकलम १०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर क्रिकेट सट्टा सांभाळणारा सुधीर चिंचोलकर (४०) रा. शास्त्रीनगर हा पोलिसांना त्या ठिकाणी आढळून आला नाही.
घटनास्थळावरून पोलिसांनी ८८ हजार रोख रक्कमेसह एक बुलेरो वाहन, दुचाक्या, मोबाईल, सट्टा उतरविण्याची सामुग्री असा एकूण ८ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढिल तपास ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात सपोनि प्रवीण हिरे व सपोनि माया चाटसे करीत आहे.