पोलीस औरंगाबादवरून रिकाम्या हाताने परतले

By admin | Published: January 17, 2016 02:29 AM2016-01-17T02:29:43+5:302016-01-17T02:29:43+5:30

फुलसावंगी येथील कापूस व्यापारी संदेश मुत्तेपवार यांच्या घरी झालेल्या २७ लाख रुपयांच्या चोरी प्रकरणाचा तपास

Police returned empty handed from Aurangabad | पोलीस औरंगाबादवरून रिकाम्या हाताने परतले

पोलीस औरंगाबादवरून रिकाम्या हाताने परतले

Next

चोरी प्रकरण : मोबाईल नेटवर्कवरून दिशाभूल
महागाव : फुलसावंगी येथील कापूस व्यापारी संदेश मुत्तेपवार यांच्या घरी झालेल्या २७ लाख रुपयांच्या चोरी प्रकरणाचा तपास करण्यासाठी औरंगाबादला गेलेले महागाव पोलीस रिकाम्या हाताने परत आले. गत आठवड्यात शुक्रवारी झालेल्या या धाडसी चोरीचा अद्यापही छडा लागला नसून, मास्टर मार्इंड मोऱ्हक्या मोबाईलचे लोकेशन बदलविण्यात पटाईत असल्याने पोलिसांची दिशाभूल होत आहे.
संदेश मुत्तेपवार यांच्या घरी धाडसी चोरी झाल्यानंतर चोरटे फुलसावंगी-ढाणकी मार्गे किनवटकडे पसार झाल्याची माहिती आहे. त्यानंतर औरंगबाद येथून फुलसावंगी येथे फोन केला. औरंगाबाद येथून फोन आल्याचे पोलिसांना माहिती झाले. त्यावरुन ठाणेदार प्रकाश शेळके, युवराज जाधव यांच्यासह पथक औरंगाबादला पोहोचले.
मोबाईल लोकेशनवरून मिळालेल्या माहितीवरून त्यांनी हॉटेल, लॉज आदींची पाहणी केली. मोबाईलवर काही संभाषण होते का याचीही चाचपणी केली. परंतु चोरट्यांचा मोबाईल स्वीच आॅफ येत आहे. त्यामुळे पोलीस औरंगाबाद येथून परत आले. स्थानिक गुन्हे शाखेमार्फतही या चोरीचा तपास सुरू आहे. मोबाईल नेटवर्क बदलत असल्याने आरोपी एका रात्री किंवा चार तासात ३०० ते ४०० किलोमीटरचे अंतर पार करीत असल्याने पोलीसही चक्रावून गेले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Police returned empty handed from Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.