यवतमाळात कामगार नोंदणीसाठी पोलिस बंदोबस्त; बॅरिकेटस तुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 01:09 PM2019-07-01T13:09:01+5:302019-07-01T13:09:50+5:30

यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयस्थित कामगार कार्यालयात सोमवारी पोलीस बंदोबस्तात कामगार नोंदणी करावी लागली.

Police settlement for labor registration in Yavatmal; Barricates breaks | यवतमाळात कामगार नोंदणीसाठी पोलिस बंदोबस्त; बॅरिकेटस तुटले

यवतमाळात कामगार नोंदणीसाठी पोलिस बंदोबस्त; बॅरिकेटस तुटले

Next
ठळक मुद्देकामगार कोसळले

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयस्थित कामगार कार्यालयात सोमवारी पोलीस बंदोबस्तात कामगार नोंदणी करावी लागली.
कामगार नोंदणीसाठी सकाळपासूनच कामगारांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या गर्दीमुळे पायऱ्यांवरील बॅरेकेट्स तुटले. त्यामुळे काही कामगार खाली कोसळले. दुसºया मजल्यावर हे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या परिसराला कामगारांच्या गर्दीमुळे जणू यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कामगार कार्यालयात पुरेसे मनुष्यबळ नसल्याने नोंदणीस विलंब होतो आहे. त्यातूनच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कामगारांची होणारी गर्दी व सोयीसुविधांचा अभाव लक्षात घेता कामगार नोंदणी कार्यालय इतरत्र हलविण्याची परवानगी या कार्यालयाने प्रशासनाकडे मागितली आहे. गेल्या काही दिवसांपासून या नोंदणीसाठी कामगारांची गर्दी सुरू आहे. रोजगार बुडवून कामगार नोंदणीसाठी येत आहेत. मात्र त्यांना वारंवार येरझारा माराव्या लागत असल्याने व दिवसभर रांगेत ताटकळत राहावे लागत असल्याने त्यांच्यात प्रचंड रोष पाहायला मिळत आहे.

Web Title: Police settlement for labor registration in Yavatmal; Barricates breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात