VIDEO: मानसिक छळ होत असल्यानं आत्महत्या करतोय! 'त्या' व्हिडीओची पोलीस चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 03:09 PM2020-12-27T15:09:35+5:302020-12-27T15:13:26+5:30

महाविद्यालय प्रशासनाने आराेप फेटाळले

police starts inquiry of assistant professors video of attempting to commit suicide | VIDEO: मानसिक छळ होत असल्यानं आत्महत्या करतोय! 'त्या' व्हिडीओची पोलीस चौकशी सुरू

VIDEO: मानसिक छळ होत असल्यानं आत्महत्या करतोय! 'त्या' व्हिडीओची पोलीस चौकशी सुरू

googlenewsNext

यवतमाळ: येथील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकाने शनिवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल केला. यात प्राध्यापकाने संस्थेचे सचिव व प्राचार्यावर गंभीर आराेप केले. हा व्हिडीओ व्हायरल हाेताच ग्रामीण पाेलिसांचे पथक महाविद्यालयात पाेहाेचले. ठाणेदार गजानन करेवाड यांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या प्राध्यापकाचा जबाब नाेंदवला असून पुढील चाैकशी सुरू आहे.

सहाय्यक प्राध्यापक माे. वसीम अब्दुल कादर हे केमेस्ट्री हा विषय शिकवितात. त्यांनी शनिवारी आत्महत्या करण्यापूर्वी संस्थेचे सचिव शीतल वातिले व प्राचार्य यांच्याकडून मानसिक छळ केला जाताे, वेतन वेळेवर दिले जात नाही, काेणतेही कारण नसताना कारणे दाखवा नाेटीस बजावून उलट-सुलट विचारपूस केली जाते, असे आराेप व्हायरल केलेल्या व्हिडीओतून केले. 



दरम्यान, सदर प्राध्यापकाला महाविद्यालयातील प्रयाेगशाळा परिचराने आत्महत्या करण्यापासून राेखले. ताेपर्यंत त्या प्राध्यापकाचा व्हिडीओ साेशल मीडियावर व्हायरल झाला हाेता. याची माहिती ग्रामीण पाेलिसांना मिळताच त्यांनी जगदंबा महाविद्यालय गाठले. तेथे त्या प्राध्यापकाची चाैकशी करत जबाब नाेंदवून घेतला. प्राध्यापकाच्या आराेपावरून काेणती नाेंद घ्यायची, याबाबत विधी अधिकाऱ्याकडे मार्गदर्शन मागवले असल्याचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी सांगितले.

महाविद्यालय प्रशासनाने या घटनेसंदर्भात खुलासा करताना प्राध्यापकाने केलेले सर्व आराेप फेटाळून लावले. सदर प्राध्यापक २५ सप्टेंबर राेजी काेणतीही पूर्वपरवानगी न घेता काॅलेज साेडून गेल्याने याबाबत काॅलेज प्रशासनाने विचारणा केली. प्रा. माे वसीम अब्दूल कादर यांनी वेतनाबाबत केलेले आराेपही तथ्यहीन असल्याचे संस्था सचिव शीतल वातिले यांनी सांगितले.

Web Title: police starts inquiry of assistant professors video of attempting to commit suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.