पोलीस, विद्यार्थ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 10:41 PM2019-08-16T22:41:47+5:302019-08-16T22:42:23+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी विविध क्षेत्रातील व्यक्तींचा उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात आला.

Police, student glory | पोलीस, विद्यार्थ्यांचा गौरव

पोलीस, विद्यार्थ्यांचा गौरव

Next
ठळक मुद्देस्वातंत्र्यदिन सोहळा : पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी विविध क्षेत्रातील व्यक्तींचा उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, नगराध्यक्ष कांचन चौधरी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर आदी उपस्थित होते.
आदर्श तलाठी पुरस्कारप्राप्त एम.एन. चवरे, आंतरिक सुरक्षा सेवा पदकप्राप्त सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत निवड झालेले अंश प्रवीण इंगळे, प्रवीण देमा अंबुरे, शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य मिळविणारे सिध्दी विश्वेश्वर वानखेडे, आर्यन रविकिरण इडातकर यांच्यासह पाटंबधारे विभागाचे अशोक जयसिंगपुरे, जिल्हास्तर युवा पुरस्कारप्राप्त शुभम बैस, शिवाणी अवगण आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.
कोल्हापूर, सांगली, सातारा आदी भागात महापुराचा प्रलय नागरिकांना वेदना देऊन गेला. संकटाच्या या काळात राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. पूरग्रस्त बांधवाच्या मदतीकरिता अनेक सामाजिक संघटना व नागरिक समोर आले आहे. यवतमाळकरांनीही या पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाकरीता मदतीचा हात समोर करावा, असे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
यावेळी पूरग्रस्तांना मदत म्हणून नीलिमा वानखेडे यांनी एक लाख रुपयांचा धनादेश, राज्य सरकारी कर्मचारी संघटना आणि महसूल कर्मचारी संघटना यांनी प्रत्येकी २५ हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्र्यांकडे सुपूर्द केला. यावेळी पालकमंत्री मदन येरावार यांनी जिल्ह्याच्या विकासाचा लेखाजोखा मांडला. संचालन चंद्रबोधी घायवटे आणि ललिता जतकर यांनी केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक राज कुमार यांचा गुणगौरव
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांना सन २०१७ व २०१८ या सलग दोन वर्षे शौर्य पदक मिळाले. आयपीएस संवर्गात एकाच अधिकाऱ्याला सलग दोन वर्ष शौर्य पदक मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे ना.मदन येरावार यांनी सांगितले.

Web Title: Police, student glory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.