भयंकर! पोलीस मुख्यालयातील वसाहतीत पोलिसाचा खून; मध्यरात्रीच्या घटनेने शहरात खळबळ
By सुरेंद्र राऊत | Published: September 15, 2022 10:58 AM2022-09-15T10:58:50+5:302022-09-15T11:04:30+5:30
पोलीस पुत्रासह दोघांना अटक : मध्यरात्रीची घटना
यवतमाळ : जिल्ह्यातील कुणाचे सत्र थांबण्यास तयार नाही. बुधवारी मध्यरात्री पोलीस मुख्यालयातील वसाहतीत चक्क पोलीस शिपायाचा हॉकी स्टिक व लोखंडी स्टील रॉडने मारहाण करून खून करण्यात आला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
निलेश खडसे (34) असे मृत पोलीस शिपायाचे नाव आहे निलेश पोलीस मुख्यालयातील बँड पथकात कार्यरत होता. बुधवारी सायंकाळी तो आरोपींसोबत सलग पाच तास विविध बार मध्ये दारू पिला निलेश दारूच्या नशेत तुल झाल्यानंतर त्याला पोलीस मुख्यालयातील मागील बाजूस असलेल्या वसाहतीमध्ये अंधाराचा फायदा घेऊन हॉकी स्टिक व स्टील रॉडने जीव जाईपर्यंत मारहाण करण्यात आली. नंतर आरोपी तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच अवधूत वाडी पोलिसांनी तेथे धाव घेतली ठाणेदार मनोज केदारे, पोलीस उपनिरीक्षक दर्शन दिकोंडवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आरोपीच्या मार्गावर असलेल्या नितीन सलाम, प्रशांत राठोड, बबलू पठाण, यांनी दोन आरोपींना अटक केली.
या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी अभिषेक उर्फ अभी राजू बोंडे (27) हा पोलीस वसाहतीतच राहतो तो पोलीस शिपायाचा मुलगा आहे. अभिषेकचा निलेश सोबत जुना वाद होता याचा वाचपा काढण्यासाठी त्याने कट रचला सोबत कुंदन मेश्राम (26) रा. परवा तालुका झरी याची मदत घेतली. दोघांनीही निलेश वर वार केले. आरोपींनी पोलिसांपुढे गुन्ह्याची कबुली दिली. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक केली.