पोलिसावर तलवार, चाकूने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 09:47 PM2018-04-12T21:47:10+5:302018-04-12T21:47:10+5:30
दारव्हा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत पोलीस शिपायावर बुधवारी रात्री येथील शंकर टॉकीज चौकात नऊ जणांनी तलवार, चाकू व रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. यात पोलीस शिपाई गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून आठ जण पसार झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : दारव्हा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत पोलीस शिपायावर बुधवारी रात्री येथील शंकर टॉकीज चौकात नऊ जणांनी तलवार, चाकू व रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. यात पोलीस शिपाई गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून आठ जण पसार झाले आहे.
श्रावण शालिकराम राऊत असे जखमी पोलीस शिपायाचे नाव आहे. दिग्रस येथील मूळ रहिवासी असलेले राऊत बुधवारी रात्री शंकर टॉकीज चौकातून जात होते. त्यावेळी नऊ जणांनी राऊत यांना कोणतेही कारण नसताना अडविले. अश्लील शिवीगाळ केली. एवढेच नाही तर चाकू, तलवार आणि रॉडने हल्ला केला. यावेळी परिसरात असलेल्या नागरिकांनी धावून जाऊन राऊत यांची या हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका केली. या हल्ल्यात त्यांच्या हात, पाय, मानेला व डोळ्याला जबर दुखापत झाली. या घटनेची तक्रार दिग्रस पोलीस ठाण्यात देण्यात आली.
त्यात शे.मोसीन उर्फ गुड्डू, शे.मुज्जफर शे. हरुन, शे.अकबर शे. हरुन, शे.लाला शे. बब्बू, शे.मुन्ना शे. रफिक, शे.पीटर शे. हरुन, शे.राजिक शे. रशीद आणि शे. फैजान शे. रहीम सर्व रा. चमनपुरा यांची नावे नमूद केली आहे. ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे यांनी तपास सुरू केला. दरम्यान हल्लेखोरातील शे.अकबर शे. हसन याला अटक करण्यात आली. पोलिसांवरच हल्ला होत असेल तर सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न या घटनेने निर्माण झाला आहे.