ढाणकीत राजकीय वातावरण तापले, आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:49 AM2021-09-24T04:49:28+5:302021-09-24T04:49:28+5:30

नगराध्यक्षांनी विकास कामात उपनगराध्यक्ष आणि एक स्वीकृत नगरसेवक अडथळा आणत असल्याचा आरोप केला होता. त्याचे खंडन करीत उपाध्यक्ष व ...

The political atmosphere in Dhanki heated up, allegations, fairies of transplants | ढाणकीत राजकीय वातावरण तापले, आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी

ढाणकीत राजकीय वातावरण तापले, आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी

Next

नगराध्यक्षांनी विकास कामात उपनगराध्यक्ष आणि एक स्वीकृत नगरसेवक अडथळा आणत असल्याचा आरोप केला होता. त्याचे खंडन करीत उपाध्यक्ष व नगरसेवकाने ३ कोटी ४० लाखांच्या निधी प्रकरणाचा बुधवारी आयोजित पत्रपरिषदेत पाढाच वाचला. अध्यक्षांनी ३ कोटी ४० लाखांच्या कामांवरील मनाईहुकूम न्यायालयाने रद्द केल्याचे सांगितले होते. यात स्वीकृत नगरसेवक शेख हमीद शेख फक्रू वादी होते.

उपनगराध्यक्ष शेख जहीर शेख मौला व स्वीकृत नगरसेवक शेख खाजा शेख फक्रू यांनी आम्ही विकास कामात कधीच अडथळा निर्माण केला नाही, असा दावा केला. १५/२/२०२० ते २९/७/२०२१ पर्यंत एकूण ९ सर्वसाधारण सभेत नगराध्यक्षांनी २०४ ठराव मांडले. त्यापैकी गावाला पोषक १७९ ठराव आम्ही बहुमताने मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. जे २५ ठराव नामंजूर केले त्यात हेलिपॅड, मुख्य रस्ते सोडून पांदण रस्ते दुरुस्ती, असे ठराव असल्याचे स्पष्ट केले.

बॉक्स

नगराध्यक्षांचा स्वाक्षरीस नकार

डेंग्यू निवारणासाठी फॉगिंग मशीन चालू करण्यासाठी डिझेल टेंडरवर नगराध्यक्षांनी स्वाक्षरी करावी म्हणून त्यांच्याशी बोललो. मात्र, स्वाक्षरी करायची की नाही हे मी ठरवणार, असे त्यांचे उत्तर होते. त्यांनी चक्क राज्यपालांकडे प्रलंबित १२ आमदारांच्या नियुक्तीचे उदाहरण दिले, असा दावाही उपाध्यक्षांनी केला. आम्हाला जर विकास कामात अडथळा निर्माण करायचा असता, तर एवढे ठराव मंजूर झालेच नसते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

230921\img-20210923-wa0045.jpg

आमच्यावरील आरोप बिनबुडाचे.

ढाणकी नगरउपाध्यक्ष व शे.खाजा शे. फक्रु यांची पत्रकार परिषदेत माहिती.

3 कोटी 40 निधीचे प्रकरण

Web Title: The political atmosphere in Dhanki heated up, allegations, fairies of transplants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.