ढाणकी नगरपंचायतीत रंगली राजकीय कुरघोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 11:13 AM2022-02-02T11:13:23+5:302022-02-02T11:15:19+5:30

ढाणकी नगरपंचायतच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत फक्त दोनच विषय समिती सभापतींची निवड झाली. तर अन्य दोन सभापतींची निवड होऊ शकली नाही.

political drama in Dhanki Nagar Panchayat | ढाणकी नगरपंचायतीत रंगली राजकीय कुरघोडी

ढाणकी नगरपंचायतीत रंगली राजकीय कुरघोडी

googlenewsNext
ठळक मुद्देदोन सभापतींची निवड : भाजपचे बहिर्गमन

यवतमाळ : ढाणकी नगरपंचायतच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत फक्त दोनच विषय समिती सभापतींची निवड झाली. तर अन्य दोन सभापतींची निवड होऊ शकली नाही. तब्बल वर्षभरानंतर सभापती निवड पार पडली. मात्र या सभेच्या निमित्ताने नगरपंचायतीत जबरदस्त राजकारण रंगल्याचे चित्र पहायला मिळाले.

पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांंनी कामकाज पाहिले. त्यांनी आपला विशेषाधिकार वापरत भाजपच्या दोन नगरसेवकांची दोन समितीमध्ये निवड केली. मात्र याला भाजपचा विरोध होता, या घडामोडीनंतर महाविकास आघाडीतर्फे सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नूरजहाबेगम यांची वर्णी लागली, तर आरोग्य समिती सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीच्या बशनूरबी सय्यद खलील यांची निवड झाली. इतर दोन विषय समितींच्या सभापतींची तांत्रिक कारणामुळे निवड झाली नाही. एका समितीसाठी संख्याबळ कमी पडले. तर दुसऱ्या समितीला अनुमोदक न लाभल्यामुळे दोन समित्या सभापतीविना राहिल्या. पाणीपुरवठा सभापतिपद मागच्या वेळेस वंचित बहुजन आघाडीकडे होते. यावेळीसुद्धा हे पद आपल्याच कडे राहण्यासाठी वंचितने प्रयत्न केला. मात्र तो असफल ठरला. दोन सभापतिपद रिक्त राहिले.

भाजप कोर्टात जाणार

सभागृहातून बाहेर पडून भाजपच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष सुरेशलाल जयस्वाल यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. मंगळवारची सभापती निवडणूक नियमबाह्य आहे. त्यामुळे आम्ही या विरोधात कोर्टात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे जयस्वाल म्हणाले. त्यांनी यावेळी औरंगाबाद खंडपीठाचे एक निकालपत्रही दाखविले.

व्हिप धुडकावणाऱ्यांवर कारवाई करणार

उपनगराध्यक्ष तथा काॅंग्रेसचे गटनेते शेख जहीर यांनी दोन दिवसांपूर्वी व्हिप जारी केला होता. मात्र मंगळवारी काही नगरसेवकांनी तो धुडकावला. त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे शेख जहीर म्हणाले.

Web Title: political drama in Dhanki Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.