ग्रामपंचायतींना निधी देणाऱ्या पंचायत समितीच्या रस्त्यांची दयनीय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:47 AM2021-07-14T04:47:07+5:302021-07-14T04:47:07+5:30
ज्ञानेश्वर ठाकरे महागाव : येथील पंचायत समिती कार्यालय परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहे. त्यामुळे कार्यालयात ये-जा करणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात ...
ज्ञानेश्वर ठाकरे
महागाव : येथील पंचायत समिती कार्यालय परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहे. त्यामुळे कार्यालयात ये-जा करणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात चालणे कठीण झाले आहे. ग्रामपंचायतींना निधी देणाऱ्या पंचायत समितीलाच रस्ते बांधकामाचा विसर पडला आहे.
तत्कालीन पंचायत समिती सभापती ॲड. डी.बी. नाईक यांनी ठराव घेऊन पंचायत समिती कायार्लय परिसरातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यांनी २००८ मध्ये परिसरातील रस्त्यांचे सौंदर्यीकरण केले. नंतर मात्र रस्त्यांच्या देखभाल दुरुस्ती व सौंदर्यीकरणासंदर्भात पाऊल उचलण्यात आले नाही.
मासिक सभेत पंचायत समिती सदस्यांनी या प्रश्नावर नजर टाकून तसा ठराव घेऊन १५ वित्त आयोगातून निधीची व्यवस्था केल्यास पंचायत समितीच्या परिसरातील रस्त्यांचे बांधकाम सहज करता येत असल्याचे जाणकारांचे मत आहे. १३ जुलै रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार यांनी येथील पंचायत समितीत आढावा सभा आयोजित केली आहे. त्या सभेत हा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.
बॉक्स
पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपण्याच्या मार्गावर
विद्यमान पदाधिकारी आणि सदस्यांचा कार्यकाळ संपण्याच्या मार्गावर आहे. त्यांचे शेवटचे सहा महिने उरले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षांनी बोलविलेल्या आढावा सभेत रस्त्याचा प्रश्न उपस्थित करून सौंदर्यीकरण करण्यासाठी पाठपुरावा करू, असे जिल्हा परिषद सदस्य विलास भुसारे यांनी सांगितले.
कोट
या संदर्भात ठराव घेण्यासंदर्भात सदस्यांसोबत चर्चा करू. तसा ठराव घेऊन सौंदर्यीकरणासाठी प्रयत्न करू.
रामचंद्र तंबाके,
उपसभापती पंचायत समिती, महागाव
120721\img_20210712_125308.jpg
पंचायत समिती कंपोज मधील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात साचलेले पाणी