‘वायपीएस’मध्ये पोक्सो कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:04 PM2019-07-22T22:04:11+5:302019-07-22T22:04:47+5:30
पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये पोक्सो कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता व्हावी यादृष्टीने आयोजित या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून दामिनी पथकाच्या सहायक पोलीस निरीक्षक विजया पंधरे, महिला पोलीस शिपाई प्रेमिला डेरे, मोहिनी धरमठोक आदी लाभले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये पोक्सो कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता व्हावी यादृष्टीने आयोजित या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून दामिनी पथकाच्या सहायक पोलीस निरीक्षक विजया पंधरे, महिला पोलीस शिपाई प्रेमिला डेरे, मोहिनी धरमठोक आदी लाभले होते.
यावेळी विजया पंधरे यांनी मार्गदर्शन आणि चित्रफितीच्या माध्यमातून वाईट आणि चांगल्या स्पर्शाविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी जागरूक आणि सतर्क राहावे, अशा सूचना त्यांनी केल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रज्ञा पोहेकर यांनी केले. दामिनी पथकातील मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. प्राचार्य डॉ. जेकब दास यांच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा पार पडली.