तेलाच्या कॅनपासून तयार केल्या कुंड्या; प्रतिभावंत शिक्षिकेचा अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 11:12 AM2021-02-11T11:12:13+5:302021-02-11T11:12:32+5:30

Yawatmal News दारव्हा तालुक्यातील वरुड येथील शाळेत एका प्रतिभावंत शिक्षिकेने तेलाच्या कॅन पासून तयार केलेल्या कुंड्या कुतूहलाचा विषय बनला आहे.

Pots made from cans of oil; A unique initiative of a talented teacher | तेलाच्या कॅनपासून तयार केल्या कुंड्या; प्रतिभावंत शिक्षिकेचा अनोखा उपक्रम

तेलाच्या कॅनपासून तयार केल्या कुंड्या; प्रतिभावंत शिक्षिकेचा अनोखा उपक्रम

Next


 लोकमत न्यूज नेटवर्क 
यवतमाळ : शाळा म्हटल की संस्कार देणारं ज्ञान मंदिर डोळ्या समोर उभं राहतं. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. दारव्हा तालुक्यातील वरुड येथील शाळेत एका प्रतिभावंत शिक्षिकेने तेलाच्या कॅन पासून तयार केलेल्या कुंड्या कुतूहलाचा विषय बनला आहे.

' माझी शाळा माझा उपक्रम ' अंतर्गत वरूड येथील शाळेत भेटी दरम्यान केंद्र प्रमुख संतोष घवळे यांनी शाळेत रोपटे लावण्या करिता कुंड्या ठेवण्याच्या सूचना केल्या. तेव्हा शाळेतील उपक्रमशील शिक्षिका प्रतिभा सुकलकर यांनी तेलाच्या कॅन पासून कुंड्या तयार करण्याची संकल्पना मांडली. मुख्याध्यापक प्रकाश राऊत यांचे सह सर्व शिक्षकांनी सहमती दर्शविली आणि त्या उपक्रमाला प्रोत्साहन दिले. दरम्यान शाळेत विद्यार्थ्यांना घरातील टाकाऊ तेलाच्या कॅन आणण्यास सांगितले. चांगला प्रतिसाद मिळाला. मोठ्या आनंदाने विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले. त्या कॅन स्वच्छ करून विशिष्ट आकार देण्यात आला. त्यावर सुबक रंग रांगोटी करण्यात आली. आकर्षक कुंड्या उदयास आल्या.

ज्या विद्यार्थ्याने कॅन आणली  त्याचे नाव कुंडीवर टाकण्यात आले.  शब्द संग्रह वाढेल या हेतूने त्या कुंडीवर सुंदर चित्रे रेखाटण्यात आली. शिक्षिका प्रतिभा सुकलकर यांनी प्रचंड मेहनत घेवुन कुंड्या साजविल्या.कुंडी मध्ये झाडे लावून संवर्धनाची जबाबदारी विद्यार्थ्यांना देण्यात आली. अतिशय कमी खर्चात तयार करण्यात आलेल्या कुंड्या लक्ष वेधून घेत आहे. विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीची आवड निर्माण करून ज्ञानदान करणारा हा उपक्रम कुतूहलाचा विषय बनला आहे.सदर उपक्रमास केंद्र प्रमुख संतोष घवळे, मुख्याध्यापक प्रकाश राऊत, शिक्षक दत्तराज पुसदकर, मनोज भुजबले, रेखा गुल्हाने, प्रतिभा कपिले यांचे प्रोत्साहन लाभले.

Web Title: Pots made from cans of oil; A unique initiative of a talented teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक