वीज ग्राहकांच्या तक्रारींची थेट ऊर्जामंत्र्यांकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 02:10 AM2017-07-21T02:10:11+5:302017-07-21T02:10:11+5:30

महावितरणकडून वीज ग्राहकांच्या तक्रारी कमी करण्यासाठी कसोसिने प्रयत्न केले जात असले तरीसुद्धा तक्रारी

Power Consumers' complaints are directly intercepted by the Energy Managers | वीज ग्राहकांच्या तक्रारींची थेट ऊर्जामंत्र्यांकडून दखल

वीज ग्राहकांच्या तक्रारींची थेट ऊर्जामंत्र्यांकडून दखल

Next

 तक्रारींचा चढता आलेख : अधिकाऱ्यांनी ग्राहकांशी थेट संपर्क साधावा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महावितरणकडून वीज ग्राहकांच्या तक्रारी कमी करण्यासाठी कसोसिने प्रयत्न केले जात असले तरीसुद्धा तक्रारी कमी होण्यापेक्षा वाढल्या आहेत. सदर बाब ऊर्जा मंत्र्यांच्या प्रत्यक्ष निदर्शनास आल्याने त्यांनी ही बाब गांभिर्याने घेतली आहे. त्यानुसार आता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्वत: वीज ग्राहकांचे मेळावे घेऊन त्यांच्या समस्या सोडवाव्यात, असे निर्देश दिले आहेत.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी यवतमाळसह विविध जिल्ह्यांना भेटी देऊन महावितरणच्या कामकाजाची पाहणी केली तथा महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. यासोबतच त्यांनी प्रत्यक्ष वीज ग्राहकांनाचा मेळावा घेऊन त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्या अपेक्षेपेक्षाही अधिक तक्रारी वीज ग्राहकांनी प्रत्यक्षरीत्या केल्या. यामध्ये विजेसंदर्भातील सर्व तक्रारींचा समावेश होता. वीज ग्राहकांच्या तक्रारी ऐकूण घेतल्या जात नाही आणि त्या वेळीच सोडविल्याही जात नसल्याचे यावेळी मंत्र्यांच्या लक्षात आले. अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून वेळीच तक्रारींची दखल घेऊन त्यांची सोडवणूक झाल्यास सर्वसामान्य वीज ग्राहक ऊर्जा मंत्र्यांपर्यंत का जाईल? हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला.
ही सर्व परिस्थिती प्रत्यक्ष पाहल्यानंतर ऊर्जामंत्र्यांनी व्यवस्थापकीय संचालक व प्रादेशिक संचालकांना पत्र पाठवून ग्राहकांच्या तक्रारी गांभिर्याने घेऊन त्यांची वेळेत सोडवणूक करण्याचे निर्देश सबंधितांना देण्याचे सांगितले. त्यानुसार मुख्य अभियंता यांनी प्रत्येक आठवड्याच्या गुरुवार, शुक्रवार, शनिवार या तीन दिवशी विभागीय कार्यालयात बैठक घेऊन ग्राहकांशी संपर्क साधावा. तसेच अधिक्षक अभियंता यांनी प्रत्येक आठवड्यात क्षेत्रीय स्तरावरील शाखा अभियंता कार्यालयात बैठक घेऊन तक्रारींचा आढावा घ्यावा तसेच ग्राहक मेळावे घेऊन वीज ग्राहकांशी थेट संपर्क साधावा जेणेकरून ग्राहकांच्या तक्रारीच शिल्लक राहणार नाहीत, असेही ऊर्जामंत्र्यांनी म्हटले आहे.
एकीकडे महावितरणच्या वरिष्ठ स्तरावरून वीज ग्राहकांना योग्य व वेळेत सेवा मिळावी, यासाठी विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. परंतु या योजनांची अंमलबजावणी योग्यरित्या होत नसल्याने ग्राहकांच्या तक्रारी कमी होताना दिसत नाही.
सतर्क व तत्पर सेवा द्या
सध्याच्या संततधार पावसामुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या अभियंता व जनमित्रांनी सतर्क व तत्पर राहावे, वीजपुरवठा खंडीत झाल्यास दुरूस्तीचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार पर्यायी व्यवस्थेतून त्वरित वीजपुरवठा सुरळीत करावा, असे असे निर्देश सर्व विभागांना मुख्य अभियंता सुहास रंगारी यांनी दिले आहेत.

Web Title: Power Consumers' complaints are directly intercepted by the Energy Managers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.