प्रदीपच्या खुनाचा तपास आश्रमशाळेभोवती केंद्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:11 PM2017-11-14T23:11:15+5:302017-11-14T23:11:45+5:30

पहिल्या वर्गात शिकणाºया निरागस प्रदीप शेळकेच्या खुनाचे दुसºया दिवशीही गूढ कायम आहे.

Pradeep's murder investigation centered around Ashramshala | प्रदीपच्या खुनाचा तपास आश्रमशाळेभोवती केंद्रित

प्रदीपच्या खुनाचा तपास आश्रमशाळेभोवती केंद्रित

Next
ठळक मुद्देगूढ कायम : श्वानाने दाखविला शाळेपर्यंत मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्क
ढाणकी : पहिल्या वर्गात शिकणाºया निरागस प्रदीप शेळकेच्या खुनाचे दुसºया दिवशीही गूढ कायम आहे. पोलीस विविध बाजूंनी तपास करीत असून श्वानाने शाळेपर्यंत माग दाखविल्याने खुनाचा तपास शाळेभोवती केंद्रित झाला आहे. दरम्यान, शवविच्छेदन करून प्रदीपचे प्रेत पार्डी चुरमूरा येथे नेण्यात आले.
ढाणकी येथील अनुदानित आश्रमशाळेत शिकणाºया प्रदीप संदीप शेळके (७) रा.पार्डी चुरमूरा याचा दगडाने ठेचून खून केल्याचे सोमवारी उघडकीस आले होते. त्याचा मृतदेह शाळेपासून ५०० फूट अंतरावर कोरड्या तलावाजवळ आढळला होता. खुनाचे गूढ उकलण्याचे आव्हान अद्यापही पोलिसांपुढे कायम आहे. विविध बाजूंनी पोलीस तपास घेत आहे. मंगळवारी अमरावती येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. पथकातील ‘जॉनी’ या श्वानाने घटनास्थळावरून थेट प्रदीप शिकत असलेल्या आदिवासी आश्रमशाळेकडे धाव घेतली. त्याचक्षणी पोलिसांनी आदिवासी आश्रमशाळेभोवती आपला तपास केंद्रित केला. काही विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाºयांची कसून चौकशी करण्यात आली. त्यांच्या बयानात पोलिसांना एकवाक्यता आढळून आली नाही. त्यानंतर पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात प्रदीप जेवण करून ताट घेऊन जाताना दिसत होता, तर दुसºया सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघे जण एक पांढºया रंगाचे पोते शाळेच्या व्हरांड्यातून ओढत असताना दिसून येते. तर काही कर्मचारी एका खोलीत आपसात चर्चा करताना दिसत आहे. त्यानंतर वीज पुरवठा खंडित झाला असल्याची माहिती आहे. दरम्यान, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव ढाणकी येथे डेरे दाखल झाले. उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे एपीआय सूरज बोंडे, बिटरगावचे ठाणेदार प्रकाश राऊत, पोलीस उपनिरीक्षक रंगनाथ जगताप मारेकºयांचा शोध घेत आहे.
बिरसा ब्रिगेडतर्फे चौकशीची मागणी
ढाणकी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी बिरसा ब्रिगेडने शवविच्छेदन गृहासमोर आंदोलन केले. कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. यावेळी मुलाचे वडील संदीप सुभाष शेळके, जयवंत वानोळे, हनवंता खोकले, अर्जुन जाधवर आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापकासह तीन कर्मचारी निलंबित
प्रदीप शेळकेच्या खुनाने आदिवासी प्रकल्प विभाग हादरून गेला आहे. ढाणकी येथील अनुदानित आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका नीता कुंभारे, वसतिगृह अधीक्षक गणेश वानखेडे, चौकीदार संतोष हुलकाने यांना निलंबित करण्यात आले. ही कारवाई पुसद येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी गणेश युवनाते यांच्या अहवालावरून अपर आयुक्त गिरीश सरोदे यांनी केली.

Web Title: Pradeep's murder investigation centered around Ashramshala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.