विजय दर्डा यांच्याकडून तपस्वींचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 11:27 PM2018-09-16T23:27:03+5:302018-09-16T23:27:24+5:30

येथील जैन स्थानकात सुरू असलेल्या चातुर्मास कार्यक्रमानिमित्त कठोर तपश्चर्या करणाऱ्या तपस्वींचे अखिल भारतीय सकल जैन समाजाचे अध्यक्ष तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी त्यांनी छ.ग.प्रवर्तक प.पू.गु.श्री. रतनमुनिजी म.सा. यांचे आशीर्वाद घेतले.

Praise of the saints by Vijay Darda | विजय दर्डा यांच्याकडून तपस्वींचे कौतुक

विजय दर्डा यांच्याकडून तपस्वींचे कौतुक

Next
ठळक मुद्देकळंब येथे चातुर्मास : रतनमुनिजी म.सा. यांचे आशीर्वाद

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : येथील जैन स्थानकात सुरू असलेल्या चातुर्मास कार्यक्रमानिमित्त कठोर तपश्चर्या करणाऱ्या तपस्वींचे अखिल भारतीय सकल जैन समाजाचे अध्यक्ष तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी त्यांनी छ.ग.प्रवर्तक प.पू.गु.श्री. रतनमुनिजी म.सा. यांचे आशीर्वाद घेतले.
यावेळी विजय दर्डा यांनी सर्व तपश्चर्या करणाºया मंडळींची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या भविष्यासाठी मंगल शुभेच्छा प्रदान केल्या. तपस्या करणाºयांचे कौतुक केले. प.पू.गु.श्री. रतनमुनिजी म.सा. यांच्या सानिध्यात आपणात तपस्या करण्याची संधी मिळाली, हे आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. कळंब येथे चातुर्मासाचे आयोजन करण्यात पुढाकार घेणाºया सर्वांना त्यांनी धन्यवाद दिले. यावेळी विजय दर्डा यांनी पूर्वजांच्या आठवणी सस्मरणाने ताज्या करुन सर्वांशी हितगुज साधले.
तपश्चर्या करणाºयांमध्ये किरणभाई शांतीलाल चोरडिया (३७ उपवास), रेखा सुरेशचंद ललवाणी (३१ उपवास), शिल्पा वीरेंद्र कोठारी (२३ उपवास), शुभांगी विजय छल्लाणी (११ उपवास), दयादेवी नरेंद्र बाघमार (११ उपवास), प्रगती अजय छल्लाणी (११ उपवास), प्रियंका पीयूष बोथरा (११ उपवास), उषा पंकज कोठारी (११ उपवास), निखिता नितीन कोठारी (११), आनंद संजय धोका (६ उपवास) यांचा समावेश आहे. या सर्वांचे विजय दर्डा यांनी अभिनंदन केले. यावेळी श्री सतीशमुनिजी म.सा., श्री शुक्लमुनिजी म.सा., श्री रमनमुनिजी म.सा., श्री आदित्यमुनिजी म.सा., लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Praise of the saints by Vijay Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.