साक्री पं. समितीच्या सभापतीपदी प्रतिभा पंकज सूर्यवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 03:19 PM2020-01-16T15:19:40+5:302020-01-16T20:08:24+5:30

यवतमाळ जिल्ह्यातील साक्री पंचायत समितीच्या सभापतीपदी प्रतिभा पंकज सूर्यवंशी तर उपसभापतीपदी अ‍ॅड. नरेंद्र उत्तमराव मराठे या महाआघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.

Pratibha Pankaj Suryavanshi as chair of the committee in Sakri panchayat samiti of Yavatmal District | साक्री पं. समितीच्या सभापतीपदी प्रतिभा पंकज सूर्यवंशी

साक्री पं. समितीच्या सभापतीपदी प्रतिभा पंकज सूर्यवंशी

googlenewsNext
ठळक मुद्देउपसभापतीपदी अ‍ॅड. नरेंद्र मराठे

लोकमत न्यूज नेटवर्क
साक्री : साक्री पंचायत समितीच्या सभापतीपदी प्रतिभा पंकज सूर्यवंशी तर उपसभापतीपदी अ‍ॅड. नरेंद्र उत्तमराव मराठे या महाआघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.
३४ सदस्य असलेल्या साक्री पंचायत समितीमध्ये निवडणुकीत महाविकास आघाडीला अपक्षांनी पाठिंबा दिल्याने त्यांच्याकडे बहुमत प्राप्त झाले होते सभापती व उपसभापती निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन साक्री पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आले होते यावेळेस सर्व 34 सदस्य उपस्थित होते सभापती व उपसभापती यांची निवड हात वर करून मतदान घेण्यात आले यावेळेस महाआघाडीच्या विजयी उमेदवारांना 21 मते मिळाली तर भाजपाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सभापतीपदासाठी भांडणे गणातील माळचे हिराबाई अरुण तर उपसभापती पदासाठी धाडणे गणातून विजयी झालेल्या रोहिणी मधुकर अकलाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते यावेळेस भारतीय जनता पक्षाचे बारा सदस्य व पिंपळनेर येथील सविता पगारे या अपक्ष उमेदवाराने त्यांना मतदान केले तर महा विकास आघाडीच्या विजयी उमेदवारांना 21 मते मिळाली निवडणूक निर्णय अधिका?्यांनी निकाल घोषित करताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष आणि विजय साजरा केला.

यावेळेस साक्री तालुक्याचे आमदार मंजुळा गावित माजी आमदार डी एस राष्ट्रवादीचे संदीप बेडसे काँग्रेसचे साक्री तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे सुरेश सोनवणे जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे शिवसेना तालुकाप्रमुख विशाल देसले साखरी चे नगराध्यक्ष ज्ञानेश्वर नागरे डॉक्टर तुळशीराम गावित विजय भामरे प्राध्यापक नरेंद्र तोरवणे जितेंद्र मराठे सचिन देसले आदी उपस्थित होते. सभापती निवड झालेल्या प्रतिभा सूर्यवंशी या चौपाळे गणातून तर उपसभापती नरेंद्र मराठे हे छडवेल पकडून गणातून विजयी झाले आहेत.


सभापती व उपसभापती यांची निवड झाल्यानंतर विजय सभेत बोलताना पोपटराव सोनवणे यांनी तसेच आमदार मंजुळा गावित सुरेश सोनवणे विशाल देसले जितेंद्र मराठे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले निवडणुकीची प्रक्रिया निवडणूक अधिकारी, जी.टी सूर्यवंशी, कक्ष अधिकारी संजय साळुंखे यांनी काम पाहिले पोलीस उपाधीक्षक (ग्रामीण )श्रीकांत घुमरे पीएसआय बनसोडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Pratibha Pankaj Suryavanshi as chair of the committee in Sakri panchayat samiti of Yavatmal District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.