प्रवीण देशमुख कृषी उत्पन्न बाजार समितीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 01:39 PM2020-03-02T13:39:08+5:302020-03-02T13:39:38+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काँग्रेसचे प्रवीण देशमुख विजयी झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काँग्रेसचे प्रवीण देशमुख विजयी झाले आहे. अमरावती विभागातून त्यांनी हा विजय मिळविला आहे. विशेष म्हणजे, राज्यात सर्वाधिक मते घेत त्यांनी विजय नोंदविला आहे. या विभागातून प्रवीण देशमुख यांनी ४८७ मते घेतली. याच विभागातून माधवराव जाधव हे शिवसेनेचे उमेदवार ४३७ मते घेत विजयी झाले आहे. या विभागात सात उमेदवारांनी आपले भाग्य अजमाविले. यातील पांडुरंग पाटील यांनी ३४१ मते घेतली. गजानन चौधरी (४०), गोविंदराव मिरगे (३६), दिलीप बेंद्रे (२२), तर मारोतराव ढवळे यांनी पाच मते घेतली आहे. या बाजार समितीच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.