दहेगाव येथे खरीपपूर्व आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:31 AM2021-06-01T04:31:37+5:302021-06-01T04:31:37+5:30

अध्यक्षस्थानी सरपंच शंकर लाकडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी गजानन इंगोले, सहायक कृषी अधिकारी पी.एल. जाधव, ...

Pre-Kharif Review Meeting at Dahegaon | दहेगाव येथे खरीपपूर्व आढावा बैठक

दहेगाव येथे खरीपपूर्व आढावा बैठक

Next

अध्यक्षस्थानी सरपंच शंकर लाकडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी गजानन इंगोले, सहायक कृषी अधिकारी पी.एल. जाधव, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, प्रगतिशील शेतकरी व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सोयाबीन बियाणे घरीच जतन करून ठेवावे व ते बियाणे घरचेच वापरावे, असे आवाहन केले, तसेच सोयाबीन बियाण्याची उगवण शक्ती तपासणी करावी, बीजप्रक्रिया करूनच शेतात ६० ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतर पेरणी करण्याचे आवाहन केले.

यावेळी एमआरजीएसअंतर्गत फळबाग लागवड करणे, निंबोळी अर्क तयार करण्यासाठी निंबोळी गोळा करणे, बिजी-३ बोगस चोर बीटी कापूस पिकांची लागवड करू नये, कोणी बोगस चोर बीटी कापूस लागवड करीत असेल किंवा विक्री करत असेल, तर त्वरित कृषी विभागाला कळवावे, असे आवाहन केले. सोयाबीन बियाणेची उगवण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. प्रधानमंत्री ठिबक, तुषार सिंचन योजना व इतर सर्व योजनांबदल मार्गदर्शन करण्यात आले.

Web Title: Pre-Kharif Review Meeting at Dahegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.