पुसद येथे गरोदर माता मोफत तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:41 AM2021-07-29T04:41:52+5:302021-07-29T04:41:52+5:30
पुसद : येथे गरोदर मातांसाठी मोफत तपासणी शिबिर घेण्यात आले. त्यात ५३ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. रोटरी क्लबच्या ...
पुसद : येथे गरोदर मातांसाठी मोफत तपासणी शिबिर घेण्यात आले. त्यात ५३ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली.
रोटरी क्लबच्या सामाजिक उपक्रमांतर्गत माता मृत्यू व बाल मृत्यू रोखण्याच्या उदेशाने हे शिबिर घेण्यात आले. शिबिरात ५३ गरोदर मातांच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासण्यात आले. त्यांना रक्तवाढीसाठी औषधे देण्यात आली. हा उपक्रम रोटरी क्लब व डांगे हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. अध्यक्षस्थानी रोटरीचे अध्यक्ष डॉ. जयानंद वाढवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष माधवी गुलहाने, प्रा. स्वाती वाठ, प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. उत्तम खांबाळकर, प्रोजेक्ट कन्व्हेनर डॉ. मीरा डांगे उपस्थित होत्या.
रोटरीच्यावतीने रोपटे देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. डॉ. मीरा डांगे यांनी उपस्थित महिला रुग्णांना रक्ताशयाविषयी माहिती दिली. डॉ. यानंद वाढवे यांनी रोटरी क्लबच्या यंदाच्या कार्यक्रमांविषयी, तर डॉ. उत्तम खांबाळकर यांनी शिबिराच्या आयोजनाबाबत माहिती दिली. यशस्वीतेसाठी रोटरीचे सचिव डॉ. विश्वास डांगे व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.