यवतमाळात स्केटिंगच्या लिम्का रेकॉर्डची तयारी
By admin | Published: March 12, 2016 02:48 AM2016-03-12T02:48:35+5:302016-03-12T02:48:35+5:30
प्रेम प्रविण बोधडे या यवतमाळ येथील सात वर्षिय चिमुकल्याने स्केटींगच्या माध्यमातून लिमका बुकमध्ये रेकॉर्ड करण्याची तयारी पूर्ण केली आहे.
नन्हा सितारा : नव जयहिंद क्रीडा मंडळाचा पुढाकार
यवतमाळ : प्रेम प्रविण बोधडे या यवतमाळ येथील सात वर्षिय चिमुकल्याने स्केटींगच्या माध्यमातून लिमका बुकमध्ये रेकॉर्ड करण्याची तयारी पूर्ण केली आहे. यासाठी नव जयहिंद क्रीडा मंडळाने पुढाकार घेतला असून १४ मार्चला प्रात्यक्षिक सादर होणार आहे. त्यासाठी दिल्लीची चमू यवतमाळात दाखल होणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत शुक्रवारी देण्यात आली.
प्रेम प्रवीण बोदडेने आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्केटींग स्पर्धेत सहभागी होवून प्रावीण्य प्राप्त केले होते. नेपाळ येथील स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले. त्यामध्ये त्याने तीन रौप्य पदक मिळवून भारताचा बहुुमान वाढविला. मेरठ येथील एशियन गेम्समध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे. यावेळी त्याला सूवर्ण पदक मिळाले. प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली त्याने आपल्या कामगिरीत सातत्य ठेवले आहे.
१४ मार्च ला लिमका बुुक आॅफ रेकॉर्डची नोंद करण्यासाठी दिल्ली येथील निरिक्षक स्मिता थॉमस यवतमाळात दाखल होणार आहेत. पोष्टल मैदाना लगतच्या रस्त्यावर दुपारी ३ वाजता लिमका रेकॉर्डचा कार्यक्रम घेतला जाणार असल्याची माहित्री पत्रपरिषदेत देण्यात आली.
पत्रकार परिषदेला नव जयहिंद क्रीडा मंडळाचे विनायक बोदडे, डॉ. सुभाष डोंगरे, डॉ. उल्हास नंदूरकर, सागर नंदूरकर, प्रदीप वानखडे, प्रकाश दौलतकार, हरि देशमुुख, अमोल बोदडे, कैलास शिंदे, प्रामुख्याने उपस्थित होते. (शहर वार्ताहर)