पावसाची हजेरी, वीज पडून बैलजोडी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 10:05 PM2019-06-22T22:05:10+5:302019-06-22T22:05:31+5:30
मृगातही प्रचंड तापमान सोसणाऱ्या जिल्ह्यात शनिवारी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. आर्णी, कळंब, नेर, उमरखेड, घाटंजी तालुक्यात पाऊस झाला. दरम्यान, राळेगाव तालुक्यातील रिधोरा शेतशिवारात वीज पडून बैलजोडी ठार झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मृगातही प्रचंड तापमान सोसणाऱ्या जिल्ह्यात शनिवारी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. आर्णी, कळंब, नेर, उमरखेड, घाटंजी तालुक्यात पाऊस झाला. दरम्यान, राळेगाव तालुक्यातील रिधोरा शेतशिवारात वीज पडून बैलजोडी ठार झाली.
वडकी परिसरात शनिवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. विजांच्या प्रचंड कडकडाटातही शेतकऱ्यांची कामे सुरू होती. रिधोरा येथील शेतकरी शेषराव जुमनाके यांच्या शेतात अचानक वीज पडल्याने त्यांचे दोन्ही बैल जागीच ठार झाले. घटनेनंतर तलाठी वाढोणकर, पोलीस पाटील ढगेश्वर मांडाळे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. दरम्यान, आर्णी, कळंब, नेर, उमरखेड तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. आर्णी तालुक्यातील लोणबेहळमध्ये धुवाधार पाऊस झाला. घाटंजी तालुक्यातील पारवा परिसरातही सरी कोसळल्या. मात्र यवतमाळ शहर आणि तालुक्याला पावसाने हुलकावणी दिली, दिवसभर केवळ ढगाळी वातावरण कायम राहिल्यावर सायंकाळी चार-दोन सरी कोसळल्याने उकाडा वाढला.