आठ लिटर पाण्याची किंमत " १३६०

By admin | Published: August 27, 2016 12:49 AM2016-08-27T00:49:13+5:302016-08-27T00:49:13+5:30

गरिबांमध्ये ‘उमेद’ जागविण्यासाठी कार्य करत असलेल्या विभागाने साधलेली किमया आश्चर्याने तोंडात बोटं घालायला लावणारी आहे.

Price of eight liters water "1360 | आठ लिटर पाण्याची किंमत " १३६०

आठ लिटर पाण्याची किंमत " १३६०

Next

घाटंजीत घडली किमया : समिती करणार आता चौकशी
घाटंजी : गरिबांमध्ये ‘उमेद’ जागविण्यासाठी कार्य करत असलेल्या विभागाने साधलेली किमया आश्चर्याने तोंडात बोटं घालायला लावणारी आहे. आठ लिटर पाण्यासाठी तब्बल एक हजार ३६० रुपये या विभागाने मोजले आहे. मिळालेला हा आकडा तोंडी नसून माहितीच्या अधिकारात याच विभागाने सादर केलेला हा पुरावा आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत घाटंजीसह इतर काही तालुक्यात गेली काही वर्षांपासून गरीब आणि अती गरीब वर्गांसाठी कार्य केले जात आहे. या अभियानांतर्गत गरिबांचा विकास किती झाला याचा लेखाजोखा नसला तरी अभियाना राबविणाऱ्यांनी मात्र ‘चांगलाच’ विकास केला आहे. बचत गटाची निर्मिती, त्यांना शासनाच्या खर्चाने प्रशिक्षण, बचती विषयी मार्गदर्शन, बँकस्तरावर कर्ज आदी बाबींसाठी हे अभियान राबविले जात आहे. यातून लाखो रुपये खर्ची घातले जात आहे. ‘उमेद’ या नावाखाली हे अभियान राबविले जात आहे.
या अभियानाची उपलब्धी आणि झालेला खर्च या विषयीची माहिती राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे जिल्हा सचिव राजीव किसन चव्हाण यांनी मागितली. यात अभियानाची ‘फलश्रुती’ पुढे आली. विविध उपक्रमांसाठी झालेल्या खर्चाची देयके मनमानी काढण्यात आली. साध्या पावत्यांवर खर्च दाखवून बिले पास झाली. ७ फेब्रुवारी २०१६ रोजी बँकर्स व्हीजीटनिमित्त यवतमाळ येथील एका प्रतिष्ठानातून आणलेल्या एक लिटर प्रमाणे आठ बॉटल्स पाण्यासाठी तब्बल एक हजार ३६० रुपयांचे बिल काढण्यात आले. जिल्हा अभियान व्यवस्थापक अमोल देवलासी यांच्या प्रमाणपत्रावरून एवढी रक्कम उचलली गेल्याची बाब पुढे आली आहे. एवढेच नव्हे तर १५ ते १९ सप्टेंबर या कालावधीत प्रशिक्षणाच्या नावाखाली उपस्थिती पत्रकही भरून घेण्यात आले. पुढील तारखांचा वापर यासाठी करण्यात आला. यावरून सदर अभियान कशासाठी राबविले जात आहे. हे स्पष्ट होते. (प्रतिनिधी)

प्रशिक्षण भत्त्यामध्येही घोळ
ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील प्रशिक्षण घाटंजी तालुक्यातील रसिकाश्रय या प्रशिक्षण केंद्रात दिले गेले. यातील देयकातही मोठा घोळ घातला गेला आहे. निवासी प्रशिक्षणात महिला निवासी नसतानाही त्यांच्या नावे देयके काढल्या गेली. प्रशिक्षण संपल्याच्या दिवसाचीही देयके काढली. प्रवासभत्ता देताना एका गावासाठी प्रत्येक वेळी वेगवेगळे दर ठरविले गेले. याची कल्पना कदाचित प्रशिक्षणार्थ्यांनाही नसावी. लाखो रुपयांच्या खरेदीची बिले कच्चा कागदावर मंजूर झाली. आता याप्रकाराच्या चौकशीसाठी प्रवीण देशमुख यांच्या अध्यक्षतेत समिती नेमण्यात आली आहे. या समितीची पहिली बैठक २५ आॅगस्टला झाली. यात काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे. सदर प्रकरणात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी राजू चव्हाण यांनी केले आहे.

Web Title: Price of eight liters water "1360

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.