जीवनावश्यक वस्तूंचे दर भिडले गगनाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:45 AM2021-09-18T04:45:06+5:302021-09-18T04:45:06+5:30
गेल्या काही महिन्यांपासून सर्वच प्रकारच्या धान्यासह शेंगदाणे, साखर, साबुदाणा, डाळ, तांदूळ, गहू व इतर खाद्यपदार्थाचे भाव वाढले आहे. खाद्यतेलाचे ...
गेल्या काही महिन्यांपासून सर्वच प्रकारच्या धान्यासह शेंगदाणे, साखर, साबुदाणा, डाळ, तांदूळ, गहू व इतर खाद्यपदार्थाचे भाव वाढले आहे. खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले आहेत. प्रत्येक महिन्यात हे दर आणखी वाढतच जात आहे. पांढरकवडा तालुक्यातील अनेक जण शेतीवर अवलंबून आहेत. शेतकरी दिवसभर शेतात मेहनत करतो. मात्र, पीक निघेपर्यंत त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अस्मानी संकट, विविध रोग यामुळे उत्पादन कमी होते. पीक निघाल्यानंतर त्याला भावही कमी मिळतो. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना शेतकऱ्यांना अक्षरश: रडू कोसळते. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणसांनी जगावे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांनी वाढ झाली. आता तर घरगुती सिलिंडर हजार रुपयांच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा चुलीच स्वयंपाकगृहात आल्या आहेत. अनेक ठिकाणी चुलीवर स्वयंपाक केला जात आहे.