दोन मुली असलेल्या आई-बाबांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 09:51 PM2019-07-19T21:51:04+5:302019-07-19T21:51:37+5:30
दोन मुलींवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणाऱ्या दाम्पत्यासह उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा जिल्हा आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला. जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दोन मुलींवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणाऱ्या दाम्पत्यासह उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा जिल्हा आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला. जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
जिल्हा परिषद आरोग्य सभापती कालिंदा पवार अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.जी. चव्हाण, सहायक संचालक डॉ. दु.गो. चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते यशवंत पवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
दोन मुलींवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेबद्दल अरुणा मोकाशे, पिंकी तुळशीराम घरगडे, ज्योत्स्ना नितीन कांबळे, सविता आकाश मलांडे, अनुराधा संजय गायकवाड यांचा साडी व मुलींच्या नावे आठ हजार रुपयांचा बाँड देऊन सत्कार करण्यात आला. जास्तीत जास्त कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेबद्दल डॉ. मोहन गेडाम, डॉ. जब्बार पठाण, डॉ. माणिक घोडसडे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
महागाव तालुका वैद्यकीय अधिकारी व चमू, प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगड, शेंबाळपिंपरी, थेरडी या केंद्रांना सन्मानित करण्यात आले. आरोग्यसेविका यू.यू. पवार, नीता पाटील, एन.टी. अगलधरे, ताई आंबेकर, आरोग्यसेवक पंजाब ढवळे, पी.के. चव्हाण, के.ए. येडके, ताई राऊत, पारधीकर, किनाके यांचाही गौरव करण्यात आला.
प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी चव्हाण यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत पाटील यांनी संचालन केले. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ. पी.एस. चव्हाण, डॉ. सुभाष ढोले, डॉ. किशोर कोषटवार, विक्रम रेवडी, डॉ. प्रीती दुधे, डॉ. प्रशांत पवार, विद्या वाडे, येरमे, वासेकर, वैशाली काकदे, पौर्णिमा गजभिये आदी उपस्थित होते.