प्राथमिक शिक्षक संघाचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 11:08 PM2017-08-05T23:08:17+5:302017-08-05T23:08:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी प्राथमिक शिक्षक संघाने येथील तिरंगा चौकात शनिवारी धरणे दिले. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा हा एक भाग होता. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत पंतप्रधानांना पाठविण्यात आले.
सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी तत्काळ करावी, प्राथमिक शिक्षणासाठी राष्टÑीय आयोग स्थापन करावा, जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करावी, नवीन पेन्शन योजना रद्द करा या मागण्यांसाठी धरणे देण्यात आले.
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमाकांत मोहरकर, जिल्हा सरचिटणीस दिगांबर जगताप, प्रमुख सल्लागार प्रदीप खंडाळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. जुनी पेन्शन योजना हक्क संघटनेचे नदीम पटेल, प्रवीण बहादे, पदवीधर सभेचे महेंद्र वेरूळकर, ‘इब्टा’ संघटनेचे दिवाकर राऊत, जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे आसाराम चव्हाण, शिक्षक सेनेचे प्रकाश सालपे, जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सारंग भटूरकर, कास्ट्राईब संघटनेचे किरण मानकर, महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे मधुकर काठोळे यांनी प्रत्यक्ष धरणे कार्यक्रमात सहभाग नोंदवून पाठिंबा दर्शविला.
ज्येष्ठ मार्गदर्शक व्ही.बी. गायकी आदींनी यावेळी मार्गदर्शन केले. निवासी जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांना निवेदन दिले. आंदोलनात शिक्षक संघाचे विकास झाडे, मिलिंद सोळंके, कैलास उईके, सुरेंद्र लोहकरे, मनोहर पेठे, पी.के. राठोड, किरण राठोड, रामराव क्षीरसागर, संजय पोकळे, प्रकाश पोटे, प्रमोद धोटे, प्रदीप मोहरे, पंजबाराव राठोड, उत्तम पवार, शेषराव आडे, सुनील देवकते, रवींद्र कचरे, सचिन सानप, कैलास गव्हाणकर, विनोद खरूलकर, गिरीष साबळे, नरेश पारधी, महावीर गेडेकर आदी सहभागी झाले होते.