आरटीओ कार्यालयात एजंटाच्याच फाईलींना प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 05:00 AM2021-08-19T05:00:00+5:302021-08-19T05:00:25+5:30

आरटीओ कार्यालयाचे संपूर्ण कामकाज ऑनलाइन झाले आहे. त्यामुळे एजंटांना लुडबुड करण्यास कुठेच वाव नाही. नागरिकांनी थेट येवून आपल्या कामाचे अर्ज केल्यास त्यांना तत्काळ मदत केली जाते. काही कामकाज पूर्ण होण्यासाठी ठराविक कालावधी लागतो. तितका वेळ द्यावाच लागणार आहे. 

Priority to agent's own files in RTO office | आरटीओ कार्यालयात एजंटाच्याच फाईलींना प्राधान्य

आरटीओ कार्यालयात एजंटाच्याच फाईलींना प्राधान्य

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आरटीओ कार्यालयात एजंटराज अजूनही कायम आहे. येथील कामकाज ऑनलाइन झाले असले तरी सर्वसामान्यांसाठी त्याचा उपयोग होत नाही. एजंटाशिवाय येथे कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. सामान्यांना कागदपत्रातील त्रुट्या दूर करतानाच नाकीनऊ येते. पुन्हा कुणी असा प्रयत्न करू नये यासाठी प्रत्येक वेळेस नवीन त्रुटी काढून परत पाठविले जाते. शेवटी एजंटाकडेच धाव घ्यावी लागते. ही लिंक तोडण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न झाले. मात्र स्थानिक पातळीवर खतपाणी मिळत आहे. 

अधिकारी म्हणतात, एजंटफ्री कार्यालय !
आरटीओ कार्यालयाचे संपूर्ण कामकाज ऑनलाइन झाले आहे. त्यामुळे एजंटांना लुडबुड करण्यास कुठेच वाव नाही. नागरिकांनी थेट येवून आपल्या कामाचे अर्ज केल्यास त्यांना तत्काळ मदत केली जाते. काही कामकाज पूर्ण होण्यासाठी ठराविक कालावधी लागतो. तितका वेळ द्यावाच लागणार आहे. 

वाहन फिटनेस सर्टिफिकेट
वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट देण्याची प्रक्रिया ईन कॅमेरा केली जावी, असे न्यायालयाचे आदेश आहे. त्यानंतरही येथे एजंटाशिवाय आरटीओ यंत्रणा हालत नाही. 

पर्मनंट लायसन्स
पर्मनंट लायसन्स मिळविण्यासाठी थेट अर्ज करून प्रयत्न केल्यास सहजासहजी परीक्षाच उत्तीर्ण होऊ दिल्या जात नाही. या उलट एजंटाकडून गेल्यास परीक्षा होत नाही. 

आरटीओ कार्यालयाचा भूलभूलय्या
- प्रत्येक कार्यालयाचे कामकाज कसे चालते याची माहिती देण्यासाठी घटनेने नागरिकांची सनद तयार केली आहे. ही सनद आरटीओ कार्यालयात पहायला मिळत नाही. इतकेच काय बरेचदा कर्मचारी वर्गही आलेल्या व्यक्तीला टोलवून लावतात. 

५० पेक्षा जास्त एजंटांचा गराडा

शासनाने प्रत्येक कामासाठी शुल्क निश्चित केले आहे. मात्र त्यापेक्षा अतिरिक्त रक्कम मोजावी लागते. एजंटाचे कमिशन दिल्याशिवाय काम भागत नाही. 
यवतमाळ आरटीओ कार्यालयात कधीही जागा ५० पेक्षा जास्त एजंट असतात. कार्यालयीन कर्मचारी कोण व एजंट कोण हाही फरक समजत नाही. 

गाडी दुसऱ्याच्या नावावर करणे
विकलेले वाहन दुसऱ्याच्या नावावर एजंटाच्या मध्यस्थीशिवाय करून दाखवावे, सरळसोपी प्रक्रिया आहे. मात्र त्याकरिता थेट जाता येत नाही, एजंट मधे लागतोच. 

एजंटकडून गेले की झटपट आणि विनातक्रार
- शिकावू परवाना नियमित करण्यासाठीची परीक्षा घेतली जाते. यात प्रश्न, उत्तरेही विचारले जातात. वाहनाची ट्रायल द्यावी लागते. 
- एजंटाकडून परवान्याचे फाईल सादर केल्यास त्यात कुठलीही अडचण काढली जात नाही. थेट शिकावू परवाना हा नियमित परवान्यात दिला जातो. 
- वाहनाची खरेदी-विक्री करतानाही थेट फाईल सादर केल्यास प्रक्रियेला महिना लोटतो. 

अतिरिक्त पैसे दिले तेव्हाच झाले काम 

आरटीओ कार्यालयात कोणत्या प्रक्रियेसाठी किती पैसे लागतात ही माहितीसुद्धा नागरिकांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे एजंटाला अतिरिक्त पैसे देऊनच वाहन नोंदणीचे काम करावे लागले. 
    - प्रथमेश बुटले 

वाहनाचे आरसी बुक हरविले होते. त्याची काॅपी काढण्यासाठीसुद्धा एजंटाचीच मदत घ्यावी लागली. ही प्रक्रिया करताना सुरुवातीला स्वत:च कागदपत्र गोळा केले. मात्र बराच वेळ होत असल्याने शेवटी एजंटाला सोबत घेतले. 
    - रावसाहेब दिघाडे 

 

Web Title: Priority to agent's own files in RTO office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.