खासगी बस जळून खाक, २५ प्रवासी बचावले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 02:23 PM2017-12-24T14:23:25+5:302017-12-24T14:30:51+5:30

कोल्हापूरवरून नागपूरला जाणारी खासगी बसला महागाव तालुक्यातील मुडाणा गावाजवळ अचानक आग लागली. चालकाच्या प्रसंगावधानाने बसमधील २५ प्रवासी सुखरूप बचावले. ही घटना रविवारी पहाटे १.३० वाजताच्या सुमारास घडली. 

A private bus burnt, 25 passengers escaped | खासगी बस जळून खाक, २५ प्रवासी बचावले

खासगी बस जळून खाक, २५ प्रवासी बचावले

googlenewsNext

यवतमाळ - कोल्हापूरवरून नागपूरला जाणारी खासगी बसला महागाव तालुक्यातील मुडाणा गावाजवळ अचानक आग लागली. चालकाच्या प्रसंगावधानाने बसमधील २५ प्रवासी सुखरूप बचावले. ही घटना रविवारी पहाटे १.३० वाजताच्या सुमारास घडली. 
कोल्हापूरवरून अनुराग ट्रॅव्हल्स (एम.एच.०४/एफ.के.१४७५) नागपूरकडे जात होती. महागाव तालुक्यातील मुडाणा गावाजवळ शिवतेज ढाब्याजवळ बसमधून अचानक धूर निघताना दिसला. चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला उभी केली. सर्व २५ प्रवाशांना बसच्या खाली उतरविले. काही वेळातच बसने पेट घेतला. संपूर्ण बस आगेच्या कवेत सापडली. रात्रीची वेळ असल्याने बस विझविण्यासाठी मदत मिळाली नाही. महागाव तालुक्यात खासगी बस पेटण्याची ही पहिलीच घटना होय. महागाव पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला. आग कशामुळे लागली, हे कळू शकले नाही.

Web Title: A private bus burnt, 25 passengers escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग