सरकारी डॉक्टरांच्या मदतीला धावले खासगी डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 05:00 AM2020-04-10T05:00:00+5:302020-04-10T05:00:25+5:30

कोरोना विषाणू संसर्ग असलेला रुग्ण अथवा संशयित यांच्यावर उपचार करताना मेडिकल स्टाफ व डॉक्टरने पुरेपूर खबरदारी घेणे आवश्यक आहे. देशात व जगात अशा रुग्णांच्या संपर्कात आलेल्या काही डॉक्टरांचा नर्सेसचा चक्क मृत्यू झाला आहे. इतकी भयावह स्थिती असतानाही यवतमाळ मेडिकलमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीच साधने पर्याप्त नाहीत. अतिशय धोकादायक स्थितीत येथील डॉक्टर्स, नर्सेस काम करत आहेत.

Private doctors rushed to the aid of government doctors | सरकारी डॉक्टरांच्या मदतीला धावले खासगी डॉक्टर

सरकारी डॉक्टरांच्या मदतीला धावले खासगी डॉक्टर

Next
ठळक मुद्देयवतमाळ ‘आयएमए’चा पुढाकार : शासकीय रुग्णालयात देणार एक हजार पीपीई कीट

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोना संशयित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एकाचवेळी कोरोनाचे आठ रुग्ण सापडले आहे. अशा स्थितीत येथील डॉक्टर व नर्सेसकडे उपचार करताना आवश्यक असलेली सुरक्षा कीटच उपलब्ध नाही. या संकटाच्या काळातही पीपीई कीटचा पुरवठा हाफकिन्स महामंडळाच्या जाचक अटीत अडकला आहे. अशा स्थितीत यवतमाळ जिल्हा मेडिकल असोसिएशनने लोकवर्गणीतून कीट पुरवठा करण्याचा निर्णय घेतला.
कोरोना विषाणू संसर्ग असलेला रुग्ण अथवा संशयित यांच्यावर उपचार करताना मेडिकल स्टाफ व डॉक्टरने पुरेपूर खबरदारी घेणे आवश्यक आहे. देशात व जगात अशा रुग्णांच्या संपर्कात आलेल्या काही डॉक्टरांचा नर्सेसचा चक्क मृत्यू झाला आहे. इतकी भयावह स्थिती असतानाही यवतमाळ मेडिकलमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीच साधने पर्याप्त नाहीत. अतिशय धोकादायक स्थितीत येथील डॉक्टर्स, नर्सेस काम करत आहेत. नागपूरवरून २०० पीपीई कीट पुरविण्यात आल्या होत्या. मात्र या कीट एकवेळा वापरल्यानंतर फेकून द्याव्या लागतात. त्यामुळे मोठ्या संख्येने कीटची आवश्यकता आहे. हाफकिन्स महामंडळाकडे मेडिकल प्रशासनाने तातडीने पीपीई कीट पुरवठा करावा अशी मागणी केली. मात्र हाफकिन्सने ठरवून दिलेल्या फॉरमेटची कीट बाजारात उपलब्ध नाही त्यामुळे अजूनही पुरवठा झाला नाही. इतर कंपन्यांच्या स्टँडर्ड कीट खरेदीला हाफकिन्सने परवानगी नाकारली आहे. पैसा असूनही शासकीय यंत्रणा नियमात अडकली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत डॉक्टरांची सुरक्षा धोक्यात आली आहे. हा गंभीर प्रकार माहीत झाल्याने यवतमाळ इंडियन मेडिकल असोसिएशनने लोकवर्गणी करून पहिल्या टप्प्यात एक हजार पीपीई कीट मेडिकल कॉलेजमध्ये भेट देण्याचा निर्णय घेतला. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजीव जोशी व सचिव डॉ. प्रशांत कसारे यांनी आवाहन करताच अवघ्या १२ तासात तीन लाखांची वर्गणी गोळा झाली. एका कंपनीला कीट पुरवठ्याबाबत आॅर्डरही दिली आहे.

स्वयंसेवी संस्था व दात्यांनी पुढे येण्याची अपेक्षा
संकटाच्या काळात अनेक संस्था व दानशूर व्यक्ती आपल्या परीने विविध प्रकारची मदत करीत आहे. याच संकटात दोन हात करणाऱ्या सरकारी डॉक्टरांना सुरक्षिततेच्या साधनांची अत्यावश्यकता आहे. डॉक्टर सुरक्षित असले तरच उद्भवलेल्या परिस्थितीशी प्रभावीपणे लढता येणार आहे. शासकीय पैसा असूनही खर्च करताना नियमांचे अडथळे येतात. अशा स्थितीत स्वयंसेवी संस्था व दानशुरांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्यावश्यक बाबींचा पुरवठा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन करण्यात येत आहे. एकट्या आयएमएच्या पुढाकाराने ही गरज भागणारी नाही, हे निश्चित.

Web Title: Private doctors rushed to the aid of government doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.