‘आरटीओ’त खासगी कर्मचारी निशाण्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 06:00 AM2019-11-28T06:00:00+5:302019-11-28T06:00:10+5:30

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मोटर वाहन निरीक्षक, सहायक मोटर वाहन निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक या पैकी अनेकांनी स्वत:जवळ कार्यालयीन कामकाजासाठी खासगी व्यक्तींची नेमणूक केली होती. या व्यक्ती थेट कार्यालयीन अभिलेख हाताळत होते. वाहन ४.० आणि सारथी ४.० या प्रणालीचे युझर आयडी, पासवर्डही काही खासगी व्यक्तींजवळ होते.

Private Employee Shooting at RTO | ‘आरटीओ’त खासगी कर्मचारी निशाण्यावर

‘आरटीओ’त खासगी कर्मचारी निशाण्यावर

googlenewsNext
ठळक मुद्देआरटीओंचा आदेश : कारवाईची तंबी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जवळपास सर्वच नियमित कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपल्या पदरी खासगी कर्मचारी नेमला होता. हा प्रकार ‘लोकमत’ने वृत्ताच्या माध्यमातून उजागर केला. त्यानंतर याची दखल परिवहन अधिकाऱ्यांनी घेतली. कार्यालयात कुणाजवळही खासगी कर्मचारी दिसल्यास थेट कारवाई केली जाईल असा आदेश बुधवारी काढला.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मोटर वाहन निरीक्षक, सहायक मोटर वाहन निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक या पैकी अनेकांनी स्वत:जवळ कार्यालयीन कामकाजासाठी खासगी व्यक्तींची नेमणूक केली होती. या व्यक्ती थेट कार्यालयीन अभिलेख हाताळत होते. वाहन ४.० आणि सारथी ४.० या प्रणालीचे युझर आयडी, पासवर्डही काही खासगी व्यक्तींजवळ होते. एकंदरच पूरक यंत्रणाच कार्यालयात कार्यान्वित केली होती. हा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने बुधवारच्या अंकात ‘आरटीओत खासगी कर्मचाऱ्यांचा हस्तक्षेप’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. याची दखल घेऊन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वाढोकर यांनी कार्यालयात खासगी कर्मचाºयांना थारा देऊ नये असा आदेश काढला. यात सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यासह मोटर वाहन निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक यांना पत्र देऊन खबरदारी घेण्याची सूचना केली आहे. या पुढे खासगी कर्मचारी आढळल्यास थेट अधिकारी-कर्मचाºयाविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला.

Web Title: Private Employee Shooting at RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.