कापूस उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 11:39 PM2018-12-01T23:39:37+5:302018-12-01T23:39:56+5:30

कापसाची उलंगवाडी दिवाळीपूर्वीच झाली. सरासरी दोन ते तीन क्विंटल उत्पन्न झाले. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. अशातच रबीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकºयांना महावितरण आणि सिंचन विभागाच्या नाकर्तेपणाला सामोरे जावे लागत आहे.

The problem of cotton growers | कापूस उत्पादक अडचणीत

कापूस उत्पादक अडचणीत

Next
ठळक मुद्देदुष्काळग्रस्तांमध्ये नैराश्य : दातोडी व सायतखर्डा येथे ‘सरकार आपल्या दारी’

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कापसाची उलंगवाडी दिवाळीपूर्वीच झाली. सरासरी दोन ते तीन क्विंटल उत्पन्न झाले. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. अशातच रबीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकºयांना महावितरण आणि सिंचन विभागाच्या नाकर्तेपणाला सामोरे जावे लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांमध्ये नैराश्य येत आहे, हे वास्तव दातोडी (ता. आर्णी), सावरगाव व सायतखर्डा (ता. पांढरकडा) येथे झालेल्या ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमात पुढे आले.
वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शेतकºयांनी त्यांच्यापुढे निर्माण झालेले प्रश्न मांडले. मागणी आल्यास पाणी सोडा, असे आदेश पालकमंत्री मदन येरावार यांनी आॅक्टोबर महिन्यात दिले. मात्र सिंचन विभागाने हा आदेश झिडकारला, असा आरोप दातोडी येथील शेतकरी प्रल्हाद पाटील जगताप यांनी केला. वेणी धरणाचे पाणी तत्काळ सोडा आणि लोअर पैनगंगा धरणविरोधी कार्यकर्त्यांवरील खटले तत्काळ मागे घेण्याची मागणी त्यांनी केली.
वीज बिल भरा, नाहीतर वीज कपात केली जाईल, असा दम विद्युत कंपनीकडून भरला जात आहे. शेतकºयांना कमीत कमी अखंडित आठ तास वीज देण्याची हमी दिल्यानंतरही जेमतेम तासभरही आणि तीही पूर्ण दाबाने पुरविली जात नाही, दररोज शेकडो मोटारी जळत आहे आदी तक्रारी यावेळी करण्यात आल्या. घाटंजी, आर्णी, वणी आणि झरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश राठोड, दातोडीचे सरपंच विकास उईके, मुबारक तंवर, प्रल्हाद पाटील जगताप, जिल्हा परिषद सदस्य पावनी कल्यमवार, पंचायत समिती सभापती सुरेश जयस्वाल, सायतखर्डाच्या सरपंच मालनबाई शेंडे आदींनी यावेळी केली.
यावेळी सुरेश बोलेनवार, बाबूलाल मेश्राम, माधवराव टेकाम, अंकित नैताम, मधुकर घसाळकर, दत्ता सिडाम, कार्यक्रमाचे संयोजक तुकाराम मोहुर्ले, अजय रेड्डी येल्टीवार, लक्ष्मण मुजमुले, संदीप गाडगे, ओमप्रकाश जगताप, अशोक पाटील, रघुनाथ शेंडे, संतोष मोहुर्ले, मधुकर चौधरी, विष्णू शेंडे, तानबा आडे, प्रभाकर देशमुख आदी उपस्थित होते.

Web Title: The problem of cotton growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.