शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आर्णीत कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 11:51 PM2018-06-05T23:51:58+5:302018-06-05T23:51:58+5:30
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पुकारण्यात आलेल्या आर्णी बंदला मंगळवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. तसेच आमदार ख्वाजा बेग यांच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पुकारण्यात आलेल्या आर्णी बंदला मंगळवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. तसेच आमदार ख्वाजा बेग यांच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
तूर, हरभरा खरेदीचा प्रश्न, पीक विम्याची न मिळालेली रक्कम, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. या सर्व प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आर्णी शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर शेतकऱ्यांची सभा झाली. त्यानंतर मुख्य मार्गाने आर्णी तहसीलवर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी आमदार ख्वाजा बेग, बाजार समिती सभापती राजू पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, रवींद्र नालमवार, शेखर खंदार, चिराग शाह, उमेश ठाकरे, उमेद फानन, खलील बेग, अमीन भाटी, ज्योत्स्ना ठाकरे, निलंकुश चव्हाण, यासीम नागानी, राजू गावंडे, राजन भागवत, गणेश मोरे, परशराम राठोड, फिरोज सोलंकी, गोपाल कोठारी, मुबारक तंवर, रामेश्वर चौधरी, संदीप बुटले, तुकाराम आडे आदी उपस्थित होते.
दरम्यान केंद्र व राज्य सरकारच्या निषेधाचा फलक तालुक्यातील दाभडी येथे लावण्यात आला. त्यावर ‘क्या हुआ तेरा वादा’ असे लिहिण्यात आले होते.