संदेश स्वाक्षरीद्वारे मांडल्या मुख्यमंत्र्यांकडे समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:43 AM2021-07-30T04:43:56+5:302021-07-30T04:43:56+5:30
पुसद : शिवसेनेने घरोघरी जाऊन जनतेशी संवाद साधला. घरकुलाच्या समस्येसह काही सूचना जनतेने केल्या. संदेश स्वाक्षरी उपक्रमाअंतर्गत थेट मुख्यमंत्र्यांकडे ...
पुसद : शिवसेनेने घरोघरी जाऊन जनतेशी संवाद साधला. घरकुलाच्या समस्येसह काही सूचना जनतेने केल्या. संदेश स्वाक्षरी उपक्रमाअंतर्गत थेट मुख्यमंत्र्यांकडे समस्याही मांडल्या.
कोरोना व पूर परिस्थितीमुळे जनता त्रस्त आहे. त्यामुळे शिवसेनेने उपजिल्हा प्रमुख तथा पालिकेचे पाणीपुरवठा सभापती ॲड. उमाकांत पापिनवार यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम राबविला. प्रभाग क्रमांक चारमध्ये एका कार्यक्रमापासून शुभारंभ करण्यात आला. ज्येष्ठ नेते राजन मुखरे अध्यक्षस्थानी होते. रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. उमेश रेवणवार, माजी अध्यक्ष डॉ. डांगे, डॉ. उत्तम खंबाळकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख ॲड. उमाकांत पापिनवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
यानंतर घरोघरी जाऊन शिवसैनिकांनी छत्री वाटप केले. ते घरी आल्याचे पाहून नागरिकांनी त्यांचे स्वागत करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर समस्या मांडल्या. या उपक्रमात रवी पांडे, दीपक काळे, दीपक उखळकर, संजय बयास, संतोष भेंडे, शंकर दळवी, विलास पेन्शनवार, देवानंद जगताप, विलास कोरडे, संतोष अंभोरे, वैभव सोनवणे, चंद्रकांत तगल्पल्लेवार, वैभव खंदारे, पुष्पा गिराम, शिल्पा ढगे, उज्ज्वला ढगे, शोभा कुलकर्णी, वंदना पद्मावार आदींनी सहभाग घेतला.