शेतकऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविणार
By admin | Published: May 27, 2017 12:22 AM2017-05-27T00:22:04+5:302017-05-27T00:22:04+5:30
शिवार संवाद सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून या समस्यांचे निराकरण करणार,
राजू तोडसाम : वांजरी येथे शिवार संवाद योजनेमार्फत गाळ उपसा कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : शिवार संवाद सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून या समस्यांचे निराकरण करणार, असल्याचे प्रतिपादन आमदार राजू तोडसाम यांनी केले. तालुक्यातील वांजरी येथे श्रमदानातून तळ्यातील गाळ उपसण्याच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्र शासनाने २५ ते २८ मे या कालावधीत शिवार संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये गाव, पोड, वस्ती, तांडा या ठिकाणी जिल्हा व तालुका पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विस्तारक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनसामान्यापर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनाचा प्रचार व प्रसार सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचण्याचे काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरु आहे. या कार्यक्रमाची सुरुवात घाटंजी तालुक्यातून करण्यात आल्याची माहिती यावेळी आमदार राजू तोडसाम यांनी आपल्या भाषणातून दिली. यावेळी संतोष चिंतावार, सुनिल बोकीलवार, शंकर सामृतवार, नंदकिशोर पंडीत, पंचायत समिती सदस्य शिला गेडाम, मंगेश वारेकर, पंकज राठोड, किशोर देशट्टीवार, नागोराव गेडाम, बंडू करमरकर, दिनेश सुरपाम, सुनिल सिडाम, राकेश नेमनवार, भाऊ रामटेके, सुनिल सिडाम, बाळ सस्ते, रुपेश चौधरी, गजानन बुरेवार, महेश चिंतावार, सतीश द्यावरशेट्टीवार, लक्ष्मण शिंदे, राजू नेमनवार, राजू नाईनवार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, गावातील नागरिक , पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.