पुसदमध्ये व्यावसायिक, कर्मचाऱ्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:17 AM2021-03-13T05:17:09+5:302021-03-13T05:17:09+5:30

विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व व्यापाऱ्यांनी स्वतःचे, तसेच स्वतःच्या दुकानातील कर्मचाऱ्यांची रॅपिड टेस्ट करून घेणे बंधनकारक असल्याचे ...

Professional, staff inspection in Pusad | पुसदमध्ये व्यावसायिक, कर्मचाऱ्यांची तपासणी

पुसदमध्ये व्यावसायिक, कर्मचाऱ्यांची तपासणी

Next

विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व व्यापाऱ्यांनी स्वतःचे, तसेच स्वतःच्या दुकानातील कर्मचाऱ्यांची रॅपिड टेस्ट करून घेणे बंधनकारक असल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी सांगितले. याबाबत त्यांनी पुसद चेंबरला माहिती दिली आहे. सर्वांच्या रॅपिड टेस्ट करण्याकरिता देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालय, तसेच तलाव लेआउटमधील वसंतराव नाईक नगरपरिषद सार्वजनिक वाचनालयात सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रॅपिड टेस्ट शिबिर सुरू राहणार आहे.

सर्व व्यापारी व कर्मचाऱ्यांनी शनिवार, रविवार व सोमवारपर्यंत आपल्या रॅपिड टेस्ट करून घेणे बंधनकारक आहे. मंगळवारपासून प्रशासनाची पाहणी मोहीम सुरू होत आहे. ज्या दुकानदारांनी टेस्ट केली नसेल, त्यांना दुकान उघडण्याची परवानगी नाकारण्यात येणार आहे. तसेच कारवाई केली जाईल, अशी माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांनी पुसद चेंबरला कळविली आहे. त्यामुळे सर्व व्यापारी संघटनांनी आपल्या सदस्यांच्या रॅपिड टेस्ट करण्यासाठी माहिती देणे व मार्गदर्शन करावे, असे आवाहन चेंबरचे अध्यक्ष सूरज डुबेवार यांनी केले आहे.

Web Title: Professional, staff inspection in Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.