पाच लाख ६७ हजारांचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त

By विशाल सोनटक्के | Published: December 30, 2023 03:26 PM2023-12-30T15:26:01+5:302023-12-30T15:26:08+5:30

या प्रकरणी बंटी सिओटीया याच्याविरुद्ध कलम १८८ भादंविसह कलम ५, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अन्वये यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Prohibited nylon manja worth 5 lakh 67 thousand seized | पाच लाख ६७ हजारांचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त

पाच लाख ६७ हजारांचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त

यवतमाळ : नायलॉन मांजाच्या वापरामुळे दरवर्षी अपघात तसेच जीविताची मोठ्या प्रमाणात हानी होत असतानाही काही विक्रेत्यांकडून नियम धाब्यावर बसवून अवैध मांजा विक्री सुरू असल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येथील मारवाडी चौकातील बंटी पतंगवाला या प्रसिद्ध दुकानात धाड टाकून पाच लाख ६७ हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. या प्रकरणी पर्यावरण संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली.

आगामी नववर्ष तसेच मकरसंक्रात सणाच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक पवन बनसोड यांच्या निर्देशावरून नायलॉन मांजा विक्रेत्याविरुद्ध जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. बंटी नंदकिशोर सिओटीया यांचे बंटी पतंगवाला हे दुकान पतंगासाठी परिसरात प्रसिद्ध आहे. या दुकानात धाड टाकली असता विविध आठ प्रकारच्या कंपन्यांचे नायलॉन मांजा असलेले बॉक्स आढळून आले. याची एकूण किमत ५ लाख ६७ हजार ५०० रुपये इतकी आहे.

या प्रकरणी बंटी सिओटीया याच्याविरुद्ध कलम १८८ भादंविसह कलम ५, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अन्वये यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात सपोनि संतोष मनवर, पोलिस अमलदार विनोद राठोड, प्रशांते हेडाऊ, आकाश सहारे, योगेश गटलेवार, योगेश टेकाम आदींनी केली.

Web Title: Prohibited nylon manja worth 5 lakh 67 thousand seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.