जिल्ह्यात भीमा कोरेगाव घटनेचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 10:04 PM2018-01-02T22:04:39+5:302018-01-02T22:05:02+5:30
जिल्ह्यातील दारव्हा, आर्णी, बोरीअरब, शेंबाळपिंपरी, यवतमाळ येथे भीमा कोरेगाव येथील हल्ल्याचा निषेध करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आले. कुठे बाजारपेठ बंद तर कुठे निषेध मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील दारव्हा, आर्णी, बोरीअरब, शेंबाळपिंपरी, यवतमाळ येथे भीमा कोरेगाव येथील हल्ल्याचा निषेध करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आले. कुठे बाजारपेठ बंद तर कुठे निषेध मोर्चा काढण्यात आला.
दारव्हा येथे निषेध मोर्चा
दारव्हा : भीमा कोरेगाव येथे भीमसैनिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दारव्हा येथे मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. समाजकंटकावर कठोर कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकाºयांना दिले. यावेळी विनय बोरकर, साहेबराव कांबळे, गौतम सोनोने, आर.के. कांबळे, बी.डी. तायडे, शिवाजी खडसे, कृष्णराव जुमळे, तुषार कांबळे, चेतन मनवर, सुधीर जंजाळ, प्रवीण खाडे, सागर सूर्यवंशी, संदीप शिले, ललित शिरसाट, मुरली मादिलशेट्टी यांच्यासह असंख्य समाजबांधव उपस्थित होते.
आर्णी येथे बंद
आर्णी : भीमा कोरेगाव येथील भ्याडहल्ल्यास जबाबदार असणाºया समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी आर्णीत बंद पुकारण्यात आला. यावेळी गृह विभाग व मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी जयराज मुनेश्वर, विनोद मनवर, सुमित पाटील, समीर पुनवटकर, स्वप्नील भगत, कुणाल आठवले, सुनील भगत, किरण कानंदे, दीपक देवतळे, संदेश भगत, प्रवीण रोडे, रतन बन्सोड, आकाश उमरे, आकाश दाभने, छोटू खंदार, प्रिंस रामटेके, धिरज मुजमुले तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच आर्णी, संविधान ग्रुप, भीम टायगर सेना, भीम ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बाजार पेठ बंद करण्यात आली होती.
बोरीअरब येथे बाजारपेठ बंद
बोरीअरब : भीमा कोरेगावच्या घटनेचे पडसाद बोरीअरब येथे पहायला मिळाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत बौद्ध समाज बांधवांनी घटनेचा निषेध नोंदविला. गावातील बाजारपेठ व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. दोषींवर कारवाईसाठी बोरीअरब ग्रामस्थांनी दारव्हा उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी माणिकराव मोडकर, प्रताप लोणारे, सदानंद तायडे, प्रकाश भिमटे, नामदेव तायडे, प्रवीण तायडे, प्रकाश खंडारे, भारत साबळे, लखन बागडे, विजय तायडे, सुनील तायडे, सचिन तायडे, अमोल इंगळे, भारत डोंगरे, संजय वासनिक, पी.बी. वानखडे, संतोष बोरकर आदी उपस्थित होते.