महू येथील घटनेचा भाबमतर्फे निषेध

By Admin | Published: July 11, 2017 01:12 AM2017-07-11T01:12:47+5:302017-07-11T01:12:47+5:30

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी असलेल्या महू येथे अ‍ॅड.बाबासाहेब आंबेडकर हे गेले असता ...

Prohibition by incident of Mahu incident | महू येथील घटनेचा भाबमतर्फे निषेध

महू येथील घटनेचा भाबमतर्फे निषेध

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी असलेल्या महू येथे अ‍ॅड.बाबासाहेब आंबेडकर हे गेले असता त्या ठिकाणी काही लोकांनी त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या वाहनावर दगडफेक केली. या हल्ल्याचा भारिप बहुजन महासंघ यवतमाळतर्फे निषेध करण्यात येवून जिल्हाध्यक्ष राजेंद्र तलवारे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या घटनची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली.
आपल्या आजोबाच्या स्मारकाला भेट देण्यासाठी गेलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या वाहनावर काही लोकांनी दगडफेक केली. अशा लोकांवर कारवाई करण्यात यावी, तसेच प्रकाश आंबेडकर यांना स्वतंत्र सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अ‍ॅड.संजीव इंगळे, विशाल पोले, ईश्वर तायडे, केशव भागवत, गुणवंत मानकर, प्रियदर्शिनी डहाणे, कपिल भगत आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

Web Title: Prohibition by incident of Mahu incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.