शासकीय कार्यालयात दलालांचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:48 AM2021-09-15T04:48:08+5:302021-09-15T04:48:08+5:30
ग्रामीण रस्त्यांची दुरूस्ती दुर्लक्षित पांढरकवडा : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याच्या दुरूस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष सुरू आहे. उखडलेले रस्ते आणि गिट्टी, ...
ग्रामीण रस्त्यांची दुरूस्ती दुर्लक्षित
पांढरकवडा : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याच्या दुरूस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष सुरू आहे. उखडलेले रस्ते आणि गिट्टी, यामुळे वाहनधारकासह नागरिकांनाही नानाविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तालुका प्रशासनाकडून मात्र या बाबीकडे दुर्लक्ष केले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
नागोराव ढेंगळे यांना पुरस्कार
वणी : तालुक्यातील मारेगाव कोरंबी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक नागोराव ढेंगळे यांना शैक्षणिक दिपस्तंभच्यावतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळा ऑनलाईन पद्धतीने पार पडला. डॉ. गोविंद नांदेडे यांच्याहस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल गटशिक्षणाधिकारी प्रकाश नागतुरे, विस्तार अधिकारी नवनाथ देवतळे, मुख्याध्यापक अरविंद गांगुलवार, राजेंद्र खोब्रागडे यांनी कौतुक केले.
विवाहित महिलेचा डेंग्यूने मृत्यू
मारेगाव : शहरातील वार्ड क्रमांक १४ मधील आयशा आकाश भेले या ३१ वर्षीय विवाहित महिलेचा डेंग्यूसदृश आजाराने नागपूर येथे रविवारी रात्री एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने मारेगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे. आयशाच्या मागे ५ वर्षांचा मुलगा, पती, सासूसासरे व बराच मोठा आप्त परिवार आहे. तालुक्यात गेल्या काही दिवसापासून शहारासह ग्रामीण भागात डेंग्यूने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.