‘एसटी’तील रोजंदार कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न तातडीने मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 05:00 AM2020-08-23T05:00:00+5:302020-08-23T05:00:06+5:30

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर २२ मार्चपासून एसटीची चाके थांबली. कालांतराने जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरू झाली. ही वाहतूक सुरू करताना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले नियम पाळण्याचे आदेश धडकले. शिवाय प्रवासी संख्याही नाममात्र मिळत गेली. अतिशय कमी प्रमाणात बसफेऱ्या सुरू झाल्याने महामंडळाने गट क्र.१ मध्ये नेमणूक दिलेल्या यवतमाळ विभागातील ११९ रोजंदार कर्मचाऱ्यांची सेवा खंडित केली.

Promptly sort out the issue of employment of salaried employees in ST | ‘एसटी’तील रोजंदार कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न तातडीने मार्गी लावा

‘एसटी’तील रोजंदार कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न तातडीने मार्गी लावा

googlenewsNext
ठळक मुद्देकामावर बोलावून घ्या । लालपरीचा आंतरजिल्हा प्रवास सुरू, महामंडळाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लालपरीची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. आता गट क्र.१ मधील रोजंदार कर्मचाऱ्यांना कामावर बोलावून घेत त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यात यावा, ही मागणी पुढे आली आहे. यवतमाळ विभागात ११९ कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्याची प्रतीक्षा आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर २२ मार्चपासून एसटीची चाके थांबली. कालांतराने जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरू झाली. ही वाहतूक सुरू करताना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले नियम पाळण्याचे आदेश धडकले. शिवाय प्रवासी संख्याही नाममात्र मिळत गेली. अतिशय कमी प्रमाणात बसफेऱ्या सुरू झाल्याने महामंडळाने गट क्र.१ मध्ये नेमणूक दिलेल्या यवतमाळ विभागातील ११९ रोजंदार कर्मचाऱ्यांची सेवा खंडित केली. हे कर्मचारी कामावर रुजू होऊन अवघे काही महिने झाले होते. लॉकडाऊनमुळे सेवा खंडित झाल्याने त्यांना धक्का बसला. आधीची सर्व कामे सोडून ते लालपरीच्या सेवेत रुजू झाले. अचानक कामबंद झाल्याने या कर्मचाऱ्यांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला. आज पाच महिन्यांपासून ते कामावर नाहीत. आता महामंडळाची आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाली आहे. बसफेऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यात यावे, अशी मागणी आहे.
संपूर्ण राज्यभरात सन २०१९ मध्ये विविध पदांसाठी महामंडळाने जाहिरात प्रसिद्ध केली होती. सुमारे चार हजार ५०० पदे या अंतर्गत भरली जाणार होती. पैकी एक हजार ३०० उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. यात चालक-वाहक यांचाही समावेश होता. या चालक, वाहकांना रोजंदार गट क्र.१ मध्ये नियुक्त्या देण्यात आल्या. या रोजंदार कर्मचाऱ्यांची सेवा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. एसटीच्या सेवेत रुजू झाल्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांनी आधीची कामे सोडून दिली. तेथून अवघ्या काही दिवसातच त्यांना कामावर येऊ नका, असे सांगण्यात आले. ‘काम नाही तर दाम नाही’ असे एसटीचे धोरण आहे. याच धोरणाचे हे कर्मचारी बळी ठरले आहे. आज पाच महिन्यांपासून त्यांना खर्च भागविताना प्रचंड अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. म्हणून या लोकांना कामावर घेण्याची मागणी होत आहे.

‘इंटक’ची राज्यव्यापी आंदोलनाची तयारी
सरळ सेवा भरती सन २०१९ अंतर्गत चालक तथा वाहक, सहायक, लिपिक टंकलेखक, राज्य संवर्ग, अधिकारी आणि अनुकंपा तत्त्वावर कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात यावे. अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेतर्फे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड व सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी दिला आहे.

Web Title: Promptly sort out the issue of employment of salaried employees in ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.