मालमत्ता कर थकला; घाटंजी पालिकेने वीज उपकेंद्राला ठोकले सील

By सुरेंद्र राऊत | Published: November 16, 2022 05:18 PM2022-11-16T17:18:40+5:302022-11-16T17:19:26+5:30

कृषिपंपांचा वीजपुरवठा झाला खंडित

property tax exhausted; municipality sealed the power station located in Ghati area of ​​Ghatanji city | मालमत्ता कर थकला; घाटंजी पालिकेने वीज उपकेंद्राला ठोकले सील

मालमत्ता कर थकला; घाटंजी पालिकेने वीज उपकेंद्राला ठोकले सील

Next

यवतमाळ : घाटंजी शहरातील घाटी परिसरात असलेल्या वीज केंद्राला नगरपालिकेने सील ठोकले आहे. वीज वितरण कंपनीने मालमत्ता कराचा भरणा न केल्यामुळे पालिका प्रशासनाने बुधवारी दुपारी ही कारवाई केली. मात्र या कारवाईमुळे नवे संकट ओढवले आहे. ग्रामीण भागातील कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. रबी हंगामात पेरणीची तयारी सुरू असताना सिंचनासाठी वीज नसल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.

वीज वितरण कंपनी कार्यालयाकडे ३१ मार्च २०२२ पर्यंत मालमत्ता कराचे २६ लाख ३४८ रुपये थकीत होते. नगरपरिषदेने या रकमेचा भरणा करावा अशी नोअीस वीज वितरण कंपनीला बजावली. मात्र याची दखल वीज कंपनीने घेतली नाही. त्यामुळे या उपकेंन्द्राला सील लावण्यात आले आहे. हे सील काढण्याचा प्रयन्त केल्यास किंवा तसे निदर्शनास आल्यास रीतसर पोलीस कार्यवाही करण्यात येईल असा दमही पालिका प्रशासनाने नोटीसच्या माध्यमातून दिला आहे. या आशयाची नोटीस कार्यालयाच्या भिंतीला चिटकविण्यास आली आहे.

महाराष्ट्र नगर पालिका अधिनियम १९६५ चे कलम १५५ ( ड ) ( १ ) अन्वये मिळालेल्या अधिकारानुसार ही कारवाई करण्यात आली. थकीत कर असलेल्या स्थावर मालमत्ता कोणत्याही रीतीने हस्तांतरण करण्यास अगर तिच्यावर भार निर्माण करण्यास, वापरण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे असेही नोटीसमध्ये नमूद आहे.

वीज उपकेंद्राला सील लावण्याची कारवाई मुख्याधिकारी अमोल माळकर व कर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली. वीज वितरण कंपनीने त्वरीत थकीत कर न भरल्यास शहरासह ग्रामीण भागातील काही गावातील वीज पुरवठा खंडित होण्याचा धोका वाढला आहे. सध्या कृषिपंपाचा वीजपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे शेतकरीही अडचणीत आले आहे.

Web Title: property tax exhausted; municipality sealed the power station located in Ghati area of ​​Ghatanji city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.