२४ गुंडांच्या तडीपारीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 10:04 PM2018-05-13T22:04:56+5:302018-05-13T22:04:56+5:30

शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्यासाठी अखेर पोलिसांनी पावले उचचली आहे. शहरातील २४ सक्रिय गुंडांचा कायम बंदोबस्त करण्यासाठी तडीपारीचे प्रस्ताव तयार केले जात आहे. यात अवधूतवाडी ठाण्यातून १२, शहर ठाण्याचे दहा आणि लोहारा ठाण्यातील दोन प्रस्तावांचा समावेश आहे.

Proposal for clearing 24 goons | २४ गुंडांच्या तडीपारीचा प्रस्ताव

२४ गुंडांच्या तडीपारीचा प्रस्ताव

Next
ठळक मुद्देदोन प्रस्तावांना मंजुरी : यवतमाळातील सक्रिय गुंडांचा कायदेशीर बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्यासाठी अखेर पोलिसांनी पावले उचचली आहे. शहरातील २४ सक्रिय गुंडांचा कायम बंदोबस्त करण्यासाठी तडीपारीचे प्रस्ताव तयार केले जात आहे. यात अवधूतवाडी ठाण्यातून १२, शहर ठाण्याचे दहा आणि लोहारा ठाण्यातील दोन प्रस्तावांचा समावेश आहे. तर यापूर्वी दाखल दोन प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून लवकरच तडीपारीची कारवाई केली जाणार आहे.
यवतमाळ शहरात गत काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. खून, मारामाऱ्या, वाटमारी आदींसह संपत्तीविषयक गुन्हे घडत आहे. खुनांच्या मालिकेने तर गत महिन्यात यवतमाळ हादरुन गेले होते. या सर्व प्रकारावर अंकुश आणण्यासाठी आता पोलिसांनी पावले उचलली आहे. शहरातील सक्रिय गुंडांना तडीपार करण्याची तयारी चालविली आहे. त्यासाठी क्राईम रेकॉर्डवरील सक्रिय गुन्हेगारांची यादी तयार केली जात आहे. यातील कोणत्या गुन्हेगाराचा तडीपारीचा प्रस्ताव दाखल करता येईल, याची चाचपणी पोलीस करीत आहे. त्यावरूनच प्रस्ताव तयार केले जात आहे. काही प्रकरणात अर्धवट राहिलेले तपास पूर्ण करून या प्रस्तावांसाठी ग्राऊंड तयार केले जात आहे. स्थानिक गुन्हेशाखा, एसडीपीओ कार्यालय आणि संबंधित ठाण्यातील जुन्या, नव्या अधिकाºयांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया सुरू आहे.
सण-उत्सवाच्या काळात घाईगडबीत तयार केलेल्या प्रस्तावात अनेक त्रुटी राहतात. याचा लाभ आरोपींना मिळतो. हे लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी तयारी केली आहे. त्यानुसार आता पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या प्रत्येक अधिकाऱ्याने किमान एक तरी तडीपारीचा प्रस्ताव तयार करावा, असे आदेश देण्यात आले आहे. मे अखेर प्रस्ताव तयार करून त्याची उपविभागीय पोलीस अधिकारी स्तरावर व त्यानंतर स्थानिक गुन्हेशाखेतील तज्ज्ञांकडून छाननी केली जाईल. सदर प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे पाठविले जाणार आहे. येथे जाणाऱ्या प्रस्तावात कोणतीही त्रुटी राहू नये याचीही दक्षता पोलीस घेत आहे. या सर्व सोपास्कारात जुलै महिन्यात तडीपारीचे आदेश मिळण्याची शक्यता आहे. यवतमाळ शहरातील २४ गुंडांचा तडीपारीच्या यादीत समावेश आहे.
अवधूतवाडी, लोहारा आणि यवतमाळ शहर ठाण्यातून प्रस्ताव मागविले आहे. शहरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी आता लाठीसोबतच लेखणीचाही प्रभावीपणे वापर केला जात आहे. अवधूतवाडी पोलीस ठाण्यांतर्गत विजय कुमरे व विनोद पवार यांच्या तडीपारीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. त्यावर लवकरच कारवाई केली जाणार आहे. याशिवाय अक्षय राठोड टोळी विरोधात एमपीडीएचा प्रस्ताव तयार असून उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी यावर विशेष परिश्रम घेतले आहे.
सण-उत्सवाच्या शांततेचे नियोजन
सण-उत्सव काळात सक्रिय गुन्हेगारांची झाडाझडती घेतली जाते. वेळेवर धावपळ करण्याऐवजी आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबरमध्ये येणाºया गणपती, रमजान ईद, दुर्गोत्सव याचे नियोजन केले जात आहे. जुलैअखेर प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाºयांकडून आदेशीत व्हावे, या अनुषंगाने तयारी सुरू आहे. प्रत्येक प्रस्तावावर परिपूर्ण अभ्यासपूर्णच कायदेशीर कारवाई केली जात आहे. यातून नवख्या अधिकाºयांनाही प्रस्ताव तयार करण्याबाबतचे प्रशिक्षणही मिळत आहे.

Web Title: Proposal for clearing 24 goons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा