राजगृहावरील हल्ल्याचा ढाणकी येथे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 05:00 AM2020-07-09T05:00:00+5:302020-07-09T05:00:27+5:30
राजगृहावरील हल्ल्याने महाराष्ट्रच नव्हे तर देशात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या निंदनीय घटनेचा निषेध म्हणून ढाणकी येथे भीम टायगर सेनेतर्फे बिटरगाव पोलीस प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. महाविकास आघाडीच्या काळात आंबेडकरी अनुयायांवर अत्याचार करण्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जातीयवादी मनोवृत्तीचे नागरिक बौद्ध बांधवांना लक्ष्य करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ढाणकी : देशातील आंबेडकरी अनुयायांचे श्रद्धास्थान असलेल्या भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृह या निवासस्थानी समाजकंटकांनी मोठ्या प्रमाणात नासधूस केली. या घटनेचा भीम टायगर सेनेने निषेध करून बिटरगाव ठाणेदारांना निवेदन दिले.
राजगृहावरील हल्ल्याने महाराष्ट्रच नव्हे तर देशात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या निंदनीय घटनेचा निषेध म्हणून ढाणकी येथे भीम टायगर सेनेतर्फे बिटरगाव पोलीस प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. महाविकास आघाडीच्या काळात आंबेडकरी अनुयायांवर अत्याचार करण्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जातीयवादी मनोवृत्तीचे नागरिक बौद्ध बांधवांना लक्ष्य करीत आहे. यामुळे समाजात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. राजगृहावर झालेला भ्याड हल्ला निंदनीय असून समाजकंटकांना त्वरित अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
या घटनेमागील मास्टर मार्इंड शोधून काढण्याची मागणी केली. महाराष्ट्रातील सर्व बौद्ध स्थळांना सुरक्षा पुरवून आंबेडकरी जनतेवर होत असलेले हल्ले तातडीने पावले उचलून थांबविण्यात यावे, अन्यथा भीम टायगर सेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना जिल्हा उपाध्यक्ष जॉन्टी विणकरे, नगरपंचायत सभापती संबोधी गायकवाड, समाधान राऊत व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.