आदिवासी बांधवांच्या हत्येचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:06 PM2019-07-22T22:06:35+5:302019-07-22T22:06:53+5:30
उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे आदिवासी लोकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. काही लोक गंभीर जखमी आहेत. या घटनेचा अखिल भारतीय विकास परिषद जिल्हा शाखेने निषेध नोंदविला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे आदिवासी लोकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. काही लोक गंभीर जखमी आहेत. या घटनेचा अखिल भारतीय विकास परिषद जिल्हा शाखेने निषेध नोंदविला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले.
भारतात आदिवासी सुरक्षित नाही, ही बाब सदर घटनेवरून स्पष्ट होते. या हत्याकांडाला जबाबदार असणाºया लोकांना तत्काळ पकडून त्यांच्याविरूद्ध जलद गती न्यायालयात खटला चालविण्यात यावा, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात गांभीर्य न दाखविल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे, जिल्हाध्यक्ष सुनील ढाले, किरण कुमरे, एम.के. कोडापे, तालुकाध्यक्ष आकाश आत्राम, राजेश मडावी, पांडुरंग आत्राम, नीळकंठराव तोडसाम, सुरेश कन्नाके, गुलाबराव कुडमथे, मुरलीधर आले, आकाश गेडाम, देवानंद सोयाम, बंडू मसराम, मनीषा तिरनकर, माणिक मडावी, पवन आत्राम, सोनल परचाके, अंबादास सलामे, अशोक गेडाम आदींच्या स्वाक्षºया आहेत.