एनआरसीविरोधात निषेध मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 06:00 AM2019-12-20T06:00:00+5:302019-12-20T06:00:14+5:30
शहरातील प्रमुख रस्त्यावरून फिरत हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहचला. तेथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या मोर्चाची सुरुवात पांढरकवडा शहरातील जामा मस्जिदपासून झाली. त्यानंतर हा मोर्चा घोषणा देत तहसील कार्यालयावर धडकला. तेथे तहसीलदार सुरेश कव्हळे यांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. या मोर्चाचा समारोप तहसील चौकात झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : केंद्र सरकारने आणलेले नागरिकता संरक्षण विधेयक धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन करणारे असून या विधेयकावर सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी पांढरकवडा येथील जमाते उलमा हिंद व बहुजन क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली आहे. याविषयात गुरूवारी मोर्चा काढण्यात आला.
शहरातील प्रमुख रस्त्यावरून फिरत हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहचला. तेथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
या मोर्चाची सुरुवात पांढरकवडा शहरातील जामा मस्जिदपासून झाली. त्यानंतर हा मोर्चा घोषणा देत तहसील कार्यालयावर धडकला. तेथे तहसीलदार सुरेश कव्हळे यांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. या मोर्चाचा समारोप तहसील चौकात झाला. शहरे काजी गजनफर अली, अबुजर जनाब, जामा मस्जिदचे मौलाना सलीम जनाब, नगरसेवक साजिद शरीफ, जफर पटेल, खालिक शेख यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. शेतकरी नेते मोहन मामिडवार, बहुजन क्रांती मोर्चाचे अॅड. किनाके, युवक कॉंग्रेसचे शिनुअन्ना नालमवार, इम्रानखान यांच्यासह असंख्य मुस्लिम बांधव या मोर्चात सहभागी होते.