उमरखेडमध्ये पुरोगामी संघटनांतर्फे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 06:00 AM2020-02-15T06:00:00+5:302020-02-15T06:00:13+5:30
सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याला या पुरोगामी संघटनांनी विरोध केला. या कायद्यामुळे संविधानाचे कलम १४, १५ व २१ चे उल्लंघन झाल्याचा आरोप केला. नागरिकांच्या अधिकारांना तडा जात असून या कायद्याआडून देशात जाती-धर्मात भांडण लावण्याचे काम केंद्र सरकार करीत असल्याचा आरोप केला. हा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी हातात तिरंगा घेत युवकांनी घोषणाबाजी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : शहरातील सर्व पुरोगामी विचारांच्या संघटनांनी एकत्र येत सीएए, एनआरसी, एनपीआर कायदा रद्द करण्याची मागणी केली. त्यासाठी शुक्रवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देत राष्ट्रपतींना निवेदन पाठविले.
सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याला या पुरोगामी संघटनांनी विरोध केला. या कायद्यामुळे संविधानाचे कलम १४, १५ व २१ चे उल्लंघन झाल्याचा आरोप केला. नागरिकांच्या अधिकारांना तडा जात असून या कायद्याआडून देशात जाती-धर्मात भांडण लावण्याचे काम केंद्र सरकार करीत असल्याचा आरोप केला. हा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी हातात तिरंगा घेत युवकांनी घोषणाबाजी केली. प्रथम पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी या संघटनांना संविधान सन्मान मार्च काढण्याची परवानगी नाकारल्याने संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर सकाळी ११ वाजताच्या सुमारास सर्व संघटनांच्या सदस्यांनी तहसील प्रांगणात एकत्रित येत निषेध व्यक्त केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर एसडीओंमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.
या संघटनांचा होता सहभाग
निषेध आंदोलनात पुरोगामी युवा ब्रिगेड, गोरसेना, जिजाऊ ब्रिगेड, मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस, मुलभूत अधिकार संघर्ष समिती (मास), अहले सुन्नत खिदमत कमिटी, एसएसएफ, अलावा ग्रुप, आम्ही भारताचे लोक, यूथ विंग जमात-ए-इस्लामी हिंद, टिपू सुलतान ब्रिगेड आदींचा सहभाग होता.