नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:28 AM2021-07-15T04:28:37+5:302021-07-15T04:28:37+5:30

फोटो दारव्हा : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, घरे आणि व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत ...

Provide immediate financial assistance to affected farmers | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्या

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्या

Next

फोटो

दारव्हा : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, घरे आणि व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

तालुक्यात शनिवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले. शेतजमीन खरडून गेली. शहरात लेंडीनाल्याचे पाणी अनेक दुकाने, घरांमध्ये शिरले. त्यामुळे शेतकरी, व्यावसायिक आणि नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदन देताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश नवरंगे, शहराध्यक्ष सिद्धार्थ गडपायले, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बोरकर, जिल्हा सरचिटणीस पंढरीनाथ सिंहे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मनमोहनसिंग चव्हाण, सेवादलचे तालुकाध्यक्ष रामधन जाधव, युवक काँग्रेसचे सचिव अतुल राऊत, जमन काझी, गुलाब चव्हाण, अशोक देशमुख, अब्दुल जावेद, गोपाल सरतापे, महेमूद अली, सर्फराज खान, राजू चवात, बद्री राऊत, विजय गोकुळे, आशिष ओले, रामभाऊ ठाकरे, गजानन मडसे, प्रफुल्ल राऊत, शिवनारायण जयस्वाल, मधुकर राठोड, छोटू देशमुख, विष्णू शिंदे, राजू अवचट, अनिल अवटिक, परशुराम टेकाम, दिगांबर महल्ले, पुरेशी डोल्हारकर, राजेश्वर जाधव, अनंत कोल्हे, नरेश राऊत, रमेश डवले, विनोद ओले, सुभाष पासले, प्रवीण जाधव, परमेश्वर येवले, श्रीराम चौधरी, प्रकाश राऊत, महादेव मोहाडे, फुलसिंग राठोड, पंडित ओले, शरद लोथे, दादाराव भोयर, संदीप राठोड, नामदेव जगताप, श्रीकृष्ण वानखडे, गणेश चौधरी, अरुण वानखडे, कैलास कटके, प्रकाश कटके, गजानन वाडेकर, राजीव भोंगे, मुकेश ठाकरे, विजय मोहाडे, सागर मोहाडे, चेतन खोडे, हरसिंग चव्हाण, रमेश कांबळे, देवराव सरतापे, सदाशिव गुघाने, भास्कर राऊत, मोहन तिरमारे, घनश्याम वानखडे, सतीश बागल आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

140721\img-20210712-wa0014.jpg

तहसीलदारांना निवेदन देताना तालुका कॉंग्रेसचे पदाधिकारी

Web Title: Provide immediate financial assistance to affected farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.